धक्कादायक! पत्नीला दुसऱ्या पुरूषांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडत होता पती, एक दिवस झाला भांडाफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 12:44 PM2022-04-02T12:44:01+5:302022-04-02T12:44:39+5:30
Bihar Crime News : पोलिसांनी सांगितलं की, भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये साधारण २ वर्ष हा प्रकार सुरू होता. सूचना मिळाल्यावर पोलिसांनी इथे छापा मारला आणि या रॅकेटचा भांडाफोड केला.
Bihar Crime News : बिहारची राजधानी पटणामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसाने देहव्यापाराचा धंदा चालवणाऱ्या एका रॅकेटचा भांडाफोड केला आहे. तसेच यातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशी दरम्यान या आरोपीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आरोपीने सांगितलं की, तो त्याच्या पत्नीकडूनच देहव्यापार करवून घेत होता. तो त्याच्या पत्नी दुसऱ्या पुरूषांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. यासाठी तो स्वत: ग्राहकांची बुकिंग करत होता.
पोलिसांनी सांगितलं की, भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये साधारण २ वर्ष हा प्रकार सुरू होता. सूचना मिळाल्यावर पोलिसांनी इथे छापा मारला आणि या रॅकेटचा भांडाफोड केला. या प्रकरणाचे धागेदोरे बिहारशरीफची जुळलेले आहेत. सध्या चौकशी सुरू असून ते धक्कादायक खुलासे करत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, देह व्यापाराचा हा धंदा विमानतळ भागातील सिद्धार्थ कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये सुरू होता. पोलिसांनी सांगितलं की, पैशांसाठी ही व्यक्ती इतकं विचित्र काम करेल याचा विचारही केला नव्हता. देह व्यापाराच्या आरोपात पकडण्यात आलेला आरोपी धनंजय कुमार स्वत: आपल्या पत्नीकडून देह व्यापार करवत होता. तो स्वत: ग्राहकांची बुकिंग करत होता. पैसे स्वत:कडे ठेवत होता. याच पैशातून तो घर चालवत होता.
पटणा पोलिसांनी या प्रकरणातील मास्टरमाइंडला अटक केली आहे. यात अडकलेल्या महिलांचीही सुटका केली आहे. एका रिपोर्टनुसार, पोलिसांनी सांगितलं की, चौकशी दरम्यान पीडित महिलांनी सांगितलं की, ती १ महिन्यापासून देह व्यापार संचालिकेच्या जाळ्यात अडकली होती. एका महिन्यातील २५ दिवस ग्राहक आणले जात होते. त्यांनी सांगितलं की, दररोज रात्री कमीत कमी दोन लोक त्यांचं शोषण करत होते.
पॉश अपार्टमेंटमध्ये देव व्यापाराचा धंदा होत असल्याचं समोर आल्याने स्थानिक लोकही हैराण झाले आहेत. त्यांना हे माहीतही नव्हतं की, त्यांच्या कॉलनीमध्ये दोन वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. पोलिसांनी सूचना मिळताच त्यांनी कारवाई केली.