धक्कादायक! बहिणीच्या दीराकडून लैंगिक शोषण, जबरदस्ती लग्न; मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासही पाडलं भाग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 10:47 AM2021-06-10T10:47:42+5:302021-06-10T10:51:00+5:30
काही वर्षांनी तरूणीचं लग्न एका ठिकाणी जुळवण्यात आलं आणि लग्नाच ठिकाणही ठरवण्यात आलं. तेव्हा आरोपीने तिच्या सासरच्या लोकांना तिचे आक्षेपार्ह फोटो पाठवले.
बिहारच्या पटणामधून पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एक महिला पतीच्या अत्याचाराला कंटाळून बुधवारी पटणा येथील नदी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तिने न्यायाची मागणी केली. महिलेने पतीवर आरोप केला आहे की, पतीने तिला त्याच्या मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी भाग पाडलं.
अश्लील फोटो काढून केलं ब्लॅकमेल
हिंदुस्थान टाइम्समध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, काही वर्षाआधी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी बहिणीच्या सासरी गेली होती. तिथे बहिणीच्या दिराने तिचं लैंगिक शोषण केलं आणि तिचे काही आक्षेपार्ह फोटो काढले. त्यानंतर तो तिला सतत ब्लॅकमेल करत राहिला. जेव्हा पीडिता घरी परतली तेव्हाही तो तिला त्रास देत होता. (हे पण वाचा : मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरूणीने प्रियकराला पाठवला सेल्फी, नंतर कालव्यात उडी घेऊन केली आत्महत्या)
तरूणीच्या होणाऱ्या पतीला पाठवले आक्षेपार्ह फोटो
काही वर्षांनी तरूणीचं लग्न एका ठिकाणी जुळवण्यात आलं आणि लग्नाच ठिकाणही ठरवण्यात आलं. तेव्हा आरोपीने तिच्या सासरच्या लोकांना तिचे आक्षेपार्ह फोटो पाठवले. ज्यामुळे तिचं लग्न मोडलं. त्यानंतर लोकांचा विचार करून तरूणीचं लग्न आरोपी तरूणासोबतच लावून देण्यात आलं.
काही दिवसांनी आरोपीने पत्नी झालेल्या तरूणीला पुन्हा त्रास देण्यास सुरूवात केली. तो तरूणीला हुंड्यसाठी त्रास देत होता. तिला अनेकदा त्याने मारहाणही केली. अखेर वैतागून पीडितेच्या वडिलांनी आरोपीला काही पैसे दिले. पण तो काही ऐकायला तयार नव्हता. (हे पण वाचा : मेहुणीवर बलात्कार केल्याने राहिली गरोदर; पीडिता बहिणीच्या प्रसूतीसाठी मदतीस आली होती)
तरूणीचा अश्लील व्हिडीओ
सीमा तेव्हा पार झाली जेव्हा आऱोपीने तरूणीचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ काढला आणि तिला आपल्या मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. याने पीडितेला चांगलाच धक्का बसला. अखेर वैतागून ती पोलिसांकडे धाव घेतली आणि पतीविरोधात तक्रार दिली.
पोलीस अधिकारी धर्मेंद्र प्रसाद म्हणालले की, रेपवेळी पीडितेचं वय १८ वर्षांपेक्षा कमी होतं. त्यामुळे आरोपी विरोधात पॉक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरूणीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी पती रणज्योति कुमार याला अटक केली आहे.