अवैध संबंधातून पतीकडून पत्नीची हत्या; मृतदेहाचे तुकडे करून नदी किनारी गाडले; अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 02:24 PM2022-02-07T14:24:08+5:302022-02-07T14:26:26+5:30

सततच्या वादाला कंटाळून संतापलेल्या पतीनं पत्नीला संपवलं; फरार पतीचा शोध सुरू

bihar husband killed wife brutally due to illegal relation with other woman | अवैध संबंधातून पतीकडून पत्नीची हत्या; मृतदेहाचे तुकडे करून नदी किनारी गाडले; अन् मग...

अवैध संबंधातून पतीकडून पत्नीची हत्या; मृतदेहाचे तुकडे करून नदी किनारी गाडले; अन् मग...

Next

पाटणा: बिहारमध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अवैध संबंधांवरून पतीनं पत्नीची धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या केली. बांका जिल्ह्यातील ताहिरपूरमध्ये ही घटना घडली.

संतापलेल्या पतीनं पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर ते नदी किनाऱ्यावर एका खड्ड्यात गाडले. हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव रिमादेवी आहे. रिमादेवीचा विवाह हेमंत यादव नावाच्या व्यक्तीशी झाला होता. लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये खटके उडू लागले. हेमंत यादवचे एका महिलेसोबत अवैध संबंध होते. त्यामुळे रिमादेवीसोबत त्याचे वाद व्हायचे.

दोघांमध्ये असलेला वाद सोडवण्यासाठी सामाजिक स्तरावर अनेकदा प्रयत्न झाले. मात्र वाद संपुष्टात आला नाही. त्यामुळे हेमंतनं पत्नीला संपवण्याचा निर्णय घेतला. धारदार शस्त्रानं त्यानं पत्नीची हत्या केली. मृतदेहाचे अनेक तुकडे केले. हेमंतनं मृतदेहाचे तुकडे नदी किनाऱ्यावर मातीखाली पुरले. मात्र काही दिवसांतच काही तुकडे बाहेर आले. ते ग्रामस्थांनी पाहिले. त्यानंतर नदी किनारी मोठी गर्दी जमली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचे तुकडे ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत यादवनं त्याच्या मित्राच्या मदतीनं पत्नीची हत्या केली. रिमादेवी आणि हेमंत यांच्यामध्ये रोज भांडणं व्हायची अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. शेजाऱ्यांनी अनेकदा त्यांची भांडणं सोडवण्याचे प्रयत्न केले. हत्येनंतर आरोपी पती हेमंत फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: bihar husband killed wife brutally due to illegal relation with other woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.