भयंकर! 3 महिन्यांनी मृत पती अचानक 'जिवंत' सापडला अन् धक्कादायक प्रकार उघड झाला; असा होता कट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 11:51 AM2021-12-25T11:51:42+5:302021-12-25T11:53:45+5:30

Crime News : पत्नीने तीन महिन्यांपासून पतीचे अपहरण करून हत्या केल्याची तक्रार विविध पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र आता अचानक पती जिवंत असल्याचं समोर आलं आहे.

bihar madhepura husband murder kidnapping complaint conspiracy disclosure police crime | भयंकर! 3 महिन्यांनी मृत पती अचानक 'जिवंत' सापडला अन् धक्कादायक प्रकार उघड झाला; असा होता कट

भयंकर! 3 महिन्यांनी मृत पती अचानक 'जिवंत' सापडला अन् धक्कादायक प्रकार उघड झाला; असा होता कट

Next

नवी दिल्ली - बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने तीन महिन्यांपासून पतीचे अपहरण करून हत्या केल्याची तक्रार विविध पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र आता अचानक पती जिवंत असल्याचं समोर आलं आहे. भयंकर बाब म्हणजे या घटनेमागे कुटुंबात सुरू असलेल्या वादामागील कट असल्याची माहिती मिळत आहे. जे ऐकल्यावर कोणाच्याही अंगावर काटा उभा राहिल. त्यानंतर असं कोणी कसं करू शकतं असा विचार करायला लोकांना भाग पडेल.

मधेपुराच्या सिंहेश्वर पोलीस ठाण्यातील हे प्रकरण आहे. जिथे मृत पतीची पत्नी रीना देवी हिने आपला पती सुधीर सिंह याची हत्या आणि अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली होती. रीना देवी यांनी FIR मध्ये पाच जणांची नावे दिली होती. रीना देवी यांनी आरोप केला होता की, तिच्यावर बलात्कार केल्यानंतर आरोपींनी पतीचे अपहरण करून त्याची हत्या केली. रीनाने न्यायासाठी पोलिसांसह आरोपींच्या अटकेसाठी मोठ्या लोकांकडे विनवणी सुरू केली. कुटुंबीयांवर पतीच्या हत्येचा आरोप केल्यानंतर रीना देवी यांनी पीएमओ, एसपी आणि डीजीपी यांना पत्र लिहून त्यांच्या अटकेची विनंती केली होती. 

तक्रारीनंतर सिंहेश्वर पोलीस ठाण्यात आरोपीच्या नातेवाईकांना सतत त्रास दिला जात होता. त्यानंतर आरोपीच्या नातेवाईकांनी मृत सुधीर सिंहचा शोध सुरू केला. नातेवाईकांनी सुधीर सिंहचा नेपाळपर्यंत शोध घेतला, मात्र काहीही मिळाले नाही. रीना देवीच्या कटात चारही बाजूंनी घेरलेल्या आरोपीच्या नातेवाईकांनी सुधीर सिंहचा नव्याने शोध सुरू केला. प्रत्येक गल्ली, भागात आणि परिसरात सुधीर सिंह यांचे फोटो लावले. अचानक आरोपीच्या नातेवाईकांना माहिती मिळाली की मृत सुधीर सिंह हा त्याच्या सासऱ्यांसोबत ख्रिश्चन मिशन रुग्णालयात दाखल आहे आणि तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

पती- पत्नीने रचला होता भयंकर कट

आरोपीच्या नातेवाईकांनी अनेक दिवस सुधीर सिंहची रेकी केली आणि त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली. या संपूर्ण प्रकरणाचे तपास अधिकारी आयओ उमेश यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित आरोपी अचानक ख्रिश्चन मिशन रुग्णालयात पोहोचले. तिथे त्यांना सुधीर सिंह पूर्णपणे तंदुरुस्त आणि जिवंत दिसला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोप करणाऱ्या रीना देवी यांची चौकशी केली. या कटामागील हेतू केवळ गोवण्याचा होता की आणखी काही होता, या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस पुन्हा तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: bihar madhepura husband murder kidnapping complaint conspiracy disclosure police crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.