स्वत:च्याच रिक्षात सापडला चालकाचा मृतदेह; १६ वर्षांपूर्वी मुस्लिम महिलेसोबत प्रेम विवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 11:04 AM2021-11-16T11:04:11+5:302021-11-16T11:05:45+5:30

मृत रिक्षा चालकाच्या पत्नीला नणंदेवर संशय; हत्या केल्याचा आरोप

in bihar man dead body found in his own auto rickshaw in 2005 he did love marriage with a muslim girl | स्वत:च्याच रिक्षात सापडला चालकाचा मृतदेह; १६ वर्षांपूर्वी मुस्लिम महिलेसोबत प्रेम विवाह

स्वत:च्याच रिक्षात सापडला चालकाचा मृतदेह; १६ वर्षांपूर्वी मुस्लिम महिलेसोबत प्रेम विवाह

Next

जमुई: बिहारच्या जमुई जिल्ह्यात एका रिक्षा चालकाचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी रिक्षा चालकाचा मृतदेह त्याच्याच घराबाहेर त्याच्याच रिक्षात आढळून आल्यानं परिसरात खळबळ माजली. खैरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या देवलाटांड गावात हा प्रकार घडला. १६ वर्षांपूर्वी रिक्षा चालकानं एका मुस्लिम महिलेशी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर त्यानं मुस्लिम धर्म स्वीकारला होता.

मृत रिक्षा चालकाचं नाव राजा अन्सारी आहे. करंट लागल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं. तर जमिनीच्या लालसेनं पतीची हत्या करण्यात आल्याचा दावा रिक्षा चालकाची पत्नी सबीना खातूननं केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस मृताच्या सासरवाडीत पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

जमुईतल्या उझंडीमध्ये वास्तव्यास असलेल्या पवन सिंह यांनी २००५ मध्ये सबीना खातूनसोबत प्रेम विवाह केला. त्यानंतर त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारत स्वत:चं नाव बदलून राजा अन्सारी ठेवलं. त्यांना दोन मुलं आहेत. अन्सारी सासरवाडीत वास्तव्याला होते. रिक्षा चालवून ते उदरनिर्वाह करायचे. शनिवारी सकाळी ते जमुईहून रिक्षा घेऊन निघाले. पण संध्याकाळपर्यंत घरी परतले नाहीत. आपण आपल्या बहिणीकडे थांबल्याचा निरोप पतीनं दिला होता, असं सबीना यांनी सांगितलं.

अन्सारी यांना करंट लागल्याचं त्यांच्या बहिणीनं सांगितलं होतं. त्यानंतर ते अन्सारी यांना घेऊन देवलाटांडला येत होते. पण दुसऱ्या दिवशी (रविवारी) सकाळी घरासमोर असलेल्या रिक्षाच्या मागच्या सीटवर अन्सारी यांचा मृतदेह मिळाला, असं अन्सारी यांच्या सासरच्या व्यक्तींनी सांगितलं. अन्सारी यांची पत्नी सबीना यांनी त्यांच्या नणंदेवर हत्येचा आरोप केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Read in English

Web Title: in bihar man dead body found in his own auto rickshaw in 2005 he did love marriage with a muslim girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.