चुलत भावाच्या प्रेमात पडली होती विवाहित महिला, त्याच्या लग्नाच्या सहा दिवसांनंतर केली त्याची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 12:52 PM2022-06-28T12:52:50+5:302022-06-28T12:53:23+5:30
Bihar Crime News : घटनेच्या काही दिवसांनंतर जेव्हा तरूणाच्या सडलेल्या मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी याची सूचना पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना मृतदेह आढळून आला.
Bihar Crime News : बिहारच्या वैशालीमधून प्रेम प्रकरणाची आणि हत्येची एक अशी घटना समोर आली आहे ज्यावर सहज विश्वास बसणार नाही. तरूणाने लग्न केलं हे त्याच्या चुलत बहिणीला सहन झालं नाही आणि याच रागातून तिने चुलत भावाच्या हत्येचा प्लान केला. पार्टीच्या बहाण्याने तिने सख्खा भाऊ, पतीच्या माध्यमातून चुलत भावाला घरी बोलवलं. पार्टी केली आणि मग त्याची हत्या केली. घटनेच्या काही दिवसांनंतर जेव्हा तरूणाच्या सडलेल्या मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी याची सूचना पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना मृतदेह आढळून आला.
हत्येचं हे प्रकरण हाजीपूरमधील आहे. मृतकाच्या मृतदेहाची स्थिती अशी होती की, त्याला ओळखंणी अवघड झालं होतं. पण जवळच सापडलेल्या त्याच्या कपड्यांवरून त्याची ओळख पटली. ज्यानंतर प्रकरणाचा खुलासा झाला. वैशालीच्या लोमामध्ये राहणाऱ्या आशा देवी यांनी 24 वर्षीय मुलगा मनीष कुमारबाबत एक तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत घराजवळच्या तीन लोकांनी त्यांचा मुलगा मनीष याला पार्टीसाठी बोलवलं होतं असा आरोप करण्यात आला होता.
आशा देवी यांनी 21 जूनला पोलिसात लिखित तक्रार दिली होती. ज्यानंतर पोलीस मनीष कुमारचा शोध घेत होते. 26 जूनला सायंकाळी लोमाच्या पंचायत सरकार भवनमध्ये एक मृतदेह असल्याची माहिती समोर आली. पोलीस तिथे पोहोचले तेव्हा मृतदेहाची स्थिती इतकी वाईट होती की, त्याला ओळखणंही अवघड झालं होतं. मृतदेहाचा चेहरा ठेचण्यात आला होता आणि तर शरीरावर जखमांचे निशाण होते. बरेच दिवस होऊ गेल्याने शरीर सडलं होतं. पण जवळच मिळालेल्या कपड्यांमुळे मनीष कुमारची ओळख पटली.
मनीषचं लग्न याच वर्षी 15 जूनला झालं होतं. याआधी मनीषचं घराच्या बाजूलाच राहत असलेल्या त्याच्या चुलत बहिणीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. त्याची चुलत बहीण विवाहित आहे. असं सांगितलं जात आहे की, तरूणी मनीषला प्रेमाला जाळ्यात अडकवून त्याची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न करत होती. पण मनीषचं लग्न झाल्याने तिचं हे स्वप्न अपूर्ण राहिलं. मग तिने भाऊ आणि पतीच्या मदतीने मनीषच्या हत्येचा प्लान केला. आता पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.