"मद्यधुंद अवस्थेत अंडरवेअरवर फिरणाऱ्या आमदाराने माझी सोन्याची अंगठी हिसकावली", सहप्रवाशाचा मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 09:55 AM2021-09-04T09:55:03+5:302021-09-04T09:57:31+5:30

MLA Gopal Mandal : याप्रकरणी दिल्ली येथील सरकारी रेल्वे पोलीस ठाण्यात आमदार गोपाल मंडल यांच्याविरोधात सहप्रवासी प्रल्हाद पासवान यांनी तक्रार दाखल केली आहे.

bihar mla wearing underwear in a drunken state snatched my gold ring co travellers big allegation on jdu mla | "मद्यधुंद अवस्थेत अंडरवेअरवर फिरणाऱ्या आमदाराने माझी सोन्याची अंगठी हिसकावली", सहप्रवाशाचा मोठा आरोप

"मद्यधुंद अवस्थेत अंडरवेअरवर फिरणाऱ्या आमदाराने माझी सोन्याची अंगठी हिसकावली", सहप्रवाशाचा मोठा आरोप

googlenewsNext

पाटणा: बिहारची राजधानी पाटण्याहून नवी दिल्लीला जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये संयुक्त जनता दलाचे (JDU) आमदार गोपाल मंडल (MLA Gopal Mandal) अंडरवेअरवर फिरत असल्याचे दिसून आले. गोपाल मंडल ट्रेनमध्ये अंडरवेअर, बनियानवर फिरत होते. दरम्यान, गोपाल मंडल यांच्यावर आता एका प्रवाशाने दारूच्या नशेत असल्याचा आरोप केला आहे. अंडरवेअर, बनियानवर फिरणाऱ्या या आमदारावर आक्षेप घेताना प्रवाशाने आपली सोन्याची अंगठी हिसकावून घेतली, असा आरोपही केला आहे. याप्रकरणी दिल्ली येथील सरकारी रेल्वे पोलीस ठाण्यात आमदार गोपाल मंडल यांच्याविरोधात सहप्रवासी प्रल्हाद पासवान यांनी तक्रार दाखल केली आहे.

प्रल्हाद पासवान यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, "आमदार पांढरे बनियान आणि अंडरवेअरवर डब्यात फिरत असताना दारूच्या नशेत होते, ज्यावेळी त्यांना याबाबत विचारले असता, आमदारांनी माझी सोन्याची अंगठी आणि साखळी हिसकावून घेतली आणि माझ्यासोबत गैरवर्तवणूक केली." दरम्यान, तक्रार दाखल केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी हे प्रकरण पुढील तपासासाठी दिल्लीतील आरा जवळील बिहिया जीआरपीकडे वर्ग केले आहे.

दरम्यान, तेजस एक्स्प्रेसच्या ए-1 बोगीतील सीट नंबर 13,14 आणि 15 वर गोपाल मंडल प्रवास करत होते. तर, जहानाबादचे रहिवाशी असलेले प्रल्हाद पासवान हे आपल्या कुटुंबीयांसमेवत ए-1 कोचमध्येच सीट नंबर 22-23 वर होते. पाटणा ते नवी दिल्ली रेल्वेस्थानक असा या दोघांचाही प्रवास होता. त्यावेळी, गोपाल मंडल हे रेल्वेच्या बोगीतच कपडे काढून अंडरवेअर आणि बनियानवर टॉयलेटसाठी गेले होते. 

ज्यावेळी गोपाल मंडल हे  परत आले तेव्हा सहप्रवासी प्रल्हाद पासवान यांनी त्यांना टोकले. बोगीत महिला प्रवासी असल्याचेही सांगितले. यावेळी गोंधळ झाला आणि पोलिसांनी हा वाद सोडवला. दरम्यान, "माझे पोट दु:खत असल्याने मी केवळ अंडरवेअर आणि बनियानवर फिरत होतो, असे स्पष्टीकरण आमदार गोपाल मंडल यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिले आहे. विशेष म्हणजे मी खोटं बोलत नाही, असेही मदार गोपाल मंडल म्हणाले.

Web Title: bihar mla wearing underwear in a drunken state snatched my gold ring co travellers big allegation on jdu mla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.