१८ वर्षाच्या मावस भावासोबत सुरू होतं अफेअर, तीन लेकरांच्या आईने पतीचा खेळ केला खल्लास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 04:08 PM2021-09-18T16:08:53+5:302021-09-18T16:09:51+5:30

नसीमा खातूनच्या सांगण्यावरून मोहम्मद सोनूने मोहम्मद इकराम, मोहम्मद बरकत, मोहम्मद उजैर नावाच्या तीन मित्रांनी मिळून प्लॅननुसार, माशूक याला दारू पाजली.

Bihar : Mother of three children killed husband with the help of boyfriend | १८ वर्षाच्या मावस भावासोबत सुरू होतं अफेअर, तीन लेकरांच्या आईने पतीचा खेळ केला खल्लास

१८ वर्षाच्या मावस भावासोबत सुरू होतं अफेअर, तीन लेकरांच्या आईने पतीचा खेळ केला खल्लास

Next

बिहारच्या झंझारपूर अनुमंडलमध्ये गेल्या बुधवारी रस्त्याच्या कडेला एका अज्ञात तरूणाचा मृतदेह आढळून आला होता ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. मुख्य रस्त्याच्या खाली झाडांमध्ये मृतदेह सापडल्याची माहिती गावातील लोकांनी पोलिसांना दिली होती. पोलिसांनी ही केस सॉल्व्ह करत खळबळजनक खुलासा केला आहे. पोलीस अधिकारी आशिष आनंद म्हणाले की, मृतकाची पत्नी ३ मुलांची आहे. तिनेच हे हत्याकांड घडवून आणलं. मृतकाचं नाव मोहम्मद माशूक आहे.

पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं आहे की, मोहम्मद माशूकची पत्नी नसीमा खातूनचं तिचा मावस भाऊ मोहम्मद सोनूसोबत गेल्या तीन वर्षांपासून अफेअर सुरू होतं. त्यामुळे पत्नीने तिच्या प्रियकरासोबत आणि त्याच्या ३ मित्रांसोबत मिळून पतीची हत्या केली. झंझारपूरचे एसडीपीओ आशिष आनंद म्हणाले की, मोहम्मद माशूकच्या हत्येत त्याचा सासूचाही समावेश होता. हत्याकांड घडवून आणणारा मोहम्मद सोनू उर्फ निजामुद्दीन रैयाम गावातील रहिवाशी आहे. त्याचं वय केवळ १८ वर्षे आहे. (हे पण वाचा : धक्कादायक! मेहुणीसोबत लग्न करण्याची भावोजीची होती इच्छा, आपल्या चारही मुलींना दिलं विष)

पोलिसांनुसार, नसीमा खातूनच्या सांगण्यावरून मोहम्मद सोनूने मोहम्मद इकराम, मोहम्मद बरकत, मोहम्मद उजैर नावाच्या तीन मित्रांनी मिळून प्लॅननुसार, माशूक याला दारू पाजली. त्यानंतर त्याला बाइकवरून मेंहथ पूलावर घेऊन गेले त्यानंतर धारदार हत्यारांनी त्याची हत्या केली. पोलिसांनी ३६ तासांच्या आत ही केस सॉल्व्ह केली. तसेच मृतकाची पत्नी, सासू आणि इतर सहा आरोपींना अटक केली.

Web Title: Bihar : Mother of three children killed husband with the help of boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.