अपघातात जखमी झाला होता पत्नीचा हात, पतीने सव्वा लाखात दिली पत्नीच्या हत्येची सुपारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 03:21 PM2021-11-17T15:21:41+5:302021-11-17T15:22:57+5:30

Bihar Crime News : बिहारच्या मुंगेरमधील ही घटना आहे. इथे पोलिसांनी ३६ तासांच्या आत मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह केली. इतकंच नाही तर आरोपींना तुरूंगातही डांबलं.

Bihar : Munger cisf personal killed wife with help of shooters | अपघातात जखमी झाला होता पत्नीचा हात, पतीने सव्वा लाखात दिली पत्नीच्या हत्येची सुपारी

अपघातात जखमी झाला होता पत्नीचा हात, पतीने सव्वा लाखात दिली पत्नीच्या हत्येची सुपारी

Next

Bihar Crime News : पत्नीची हत्या करण्यासाठी सीआयएसएफ जवानाने असा प्लॅन केला ज्याबाबत समजल्यावर सगळेच हैराण झाले. ज्या पत्नीवर तो खूप प्रेम करत असल्याचं नाटक करत होता, तिचीच हत्या करण्यासाठी त्याने प्रोफेशनल किलर्स म्हणजे शूटर्सना सुपारी दिली होती. त्याने  सव्वा लाख रूपये देऊन पत्नीची हत्या करवून घेतली. पोलिसांनी जेव्हा या केसचा खुलासा केला तर सर्वांनाच धक्का बसला.

बिहारच्या मुंगेरमधील ही घटना आहे. इथे पोलिसांनी ३६ तासांच्या आत मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह केली. इतकंच नाही तर आरोपींना तुरूंगातही डांबलं. मुंगेरमध्ये १५ नोव्हेंबरला कासिम बाजार भागात एका महिलेची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी ३६ तासांच्या आताच पोलिसांनी खुलासा करत मृत महिलेच्या पतीसह पाच लोकांना अटक केली. 

महिलेची तिच्या सासरी सकाळी ५ वाजता हत्या करण्यात आली. ती शौचास जात असताना तिच्यावर गोळी झाडून तिची हत्या करण्यात आली. मृत महिलेच्या भावाने पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा दीर, भावसासरा राजीव कुमार आणि काही नातेवाईकांचे कॉल डीटेल्स काढले होते. ज्याच्या आधारावर शूटर गौतम कुमार पतलू आणि संजीव कुमारला अटक करण्यात आली.

शूटर गौतम कुमारने सांगितलं की, सीआयएसएफ जवानाला आपल्या पत्नीची हत्या करायची होती. त्यासाठी १ लाख २० हजार रूपयांचा सौदा ठरला. त्याने आधी २० हजार रूपये दिली. १४ नोव्हेंबरला पूर्ण प्लॅन तयार केला. आणि ती शौचालयाला जात असताना हत्या करण्याचं ठरलं. 

याआधीही मृत महिला दीपिका शर्माच्या माहेरीही एकदा गोळीबाराची घटना घडली होती. त्यावेळी ती ७ महिन्यांची गर्भवती होती. त्यावेळी तिच्या हाताला एक गोळी लागली होती. त्यामुळे तिच्या डाव्या हाताने काम करणं बंद केलं होतं. त्यामुळे मृत महिलेच्या सासरचे लोक तिला नापसंत करत होते. पोलिसांनी या प्रकरणी पाच लोकांना अटक केलीये. 
 

Web Title: Bihar : Munger cisf personal killed wife with help of shooters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.