गर्लफ्रेन्डसोबत लग्न करण्यासाठी रचली स्वत:च्या मर्डरची कहाणी, मोबाइलमुळे झाला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 11:27 AM2022-01-20T11:27:36+5:302022-01-20T11:28:33+5:30
Bihar Crime News : पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेणं सुरू केलं तर अनेक दिवस काहीच समजलं नाही. शेवटी तरूणाचा मोबाइल ट्रॅक करण्यात आला, तेव्हा प्रकरणाचा खुलासा झाला.
Bihar Crime News : बिहारच्या छपरा जिल्ह्यात एका तरूणाने आपल्या प्रेयसीसोबत मिळून स्वत:च्या हत्येची खोटी कहाणी रचली. तरूणाला प्रेयसीसोबत लग्न करायचं होतं आणि कुटुंबिय यात अडसर ठरत होते. त्याने ब्लड बॅंकमधून ब्लड घेऊन रस्त्यावर टाकून स्वत:च्या हत्येची बातमी प्रेयसीच्या माध्यमातून कुटुंबियांपर्यंत पोहोचवली. कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेणं सुरू केलं तर अनेक दिवस काहीच समजलं नाही. शेवटी तरूणाचा मोबाइल ट्रॅक करण्यात आला, तेव्हा प्रकरणाचा खुलासा झाला.
मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना बरवाघाट बलुआ टोला गावातील आहे. पोलीस स्टेशनमध्ये २२ वर्षीय तरूण मुन्ना शाह याची प्रेम प्रकरणातून हत्या करून मतदेह गायब केल्याची केस दाखल करण्यात आली होती. केस दाखल केल्यावर पोलिसांनी कथित मृत मुन्ना शाहचा शोध सुरू केला.
पोलिसांनी आजूबाजूचे गाव, नदी, नाले सगळीकडे शोध घेतला. पण मृतक कुठेही सापडला नाही. कडाक्याच्या थंडीत पोलीस अधिकारी राजेश कुमार रंजन आणि दरियापूरचे रत्नेश कुमार वर्मा हे तरूणाचा शोध घेत होते. पण त्याचा कुठेही पत्ता लागला नाही.
त्यानंतर एसपी संतोष कुमार यांच्या आदेशावरून पोलिसांनी कथित मृत तरूणाचा मोबाइल ट्रेस करणं सुरू केलं. तेव्हा पोलिसांच्या हाती महत्वाची माहिती लागली. याप्रकरणी डीएसपी इंद्रजीत बैठा यांनी सांगितलं की, आपल्या मित्रांसोबत आणि प्रेयसीसोबत मिळून मुन्ना शाहने आपल्या मृत्यूची कहाणी बनवली. त्याला मोबाइल ट्रॅकिंगच्या आधारावर बुधवारी दरियापूरमधून अटक करण्यात आली.
चौकशी दरम्यान मुन्ना शाह याने अनेक हैराण करणारे खुलासे केले. पोलिसांनुसार, या प्लानमध्ये मुन्ना शाह याचे मित्र आणि प्रेयसीही सहभागी होती. मुन्ना शाहने हा पूर्ण प्लान आपल्या कुटुंबियांना त्रास देण्यासाठी केला होता. जेणेकरून तो सहजपणे आपल्या प्रेयसीसोबत लग्न करू शकेल. मुन्ना शाहने एक कार भाड्याने घेतली. त्यानंतर ब्लड बॅंकमधून ब्लड घेऊन रस्त्यावर टाकलं आणि गायब झाला. मुन्ना आणि त्याच्या प्रेयसीला अटक करण्यात आली आहे.