खून का सौदागर! घरात सुरू होता रक्ताचा काळाबाजार; रुग्णांना दिलं गेलं दारुड्याचं रक्त अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 10:16 PM2021-06-26T22:16:59+5:302021-06-26T22:25:21+5:30

Crime News : घरामध्ये रक्ताचा काळाबाजार सुरू असून दारुड्या व्यक्तींचं रक्त पुरवलं जात असल्याचा संतापजनक प्रकार आता उघडकीस आला आहे.

bihar news blood business caught in purnia two accused arrested | खून का सौदागर! घरात सुरू होता रक्ताचा काळाबाजार; रुग्णांना दिलं गेलं दारुड्याचं रक्त अन्...

खून का सौदागर! घरात सुरू होता रक्ताचा काळाबाजार; रुग्णांना दिलं गेलं दारुड्याचं रक्त अन्...

Next

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता घडली आहे. घरामध्ये रक्ताचा काळाबाजार सुरू असून दारुड्या व्यक्तींचं रक्त पुरवलं जात असल्याचा संतापजनक प्रकार आता उघडकीस आला आहे. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात पोलीस आणि आरोग्य विभागाच्या टीमने रक्ताचा काळात बाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ही टोळी दारुड्यांचं रक्त काढून खासगी रुग्णालये आणि गरजवंतांना सप्लाय करत होती. नशा करणाऱ्या व्यक्तींचं रक्त चढवल्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू होता. 

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कप्तानपाडा भागात गेल्या एक वर्षांपूर्वी राजकुमार मंडल नावाच्या तरुणाने घर खरेदी केलं होतं. या घरात रक्ताचा काळाबाजार केला जात होता. स्थानिक महिलांनी दररोज येथे 10 ते 12 दारूडे आणि रिक्षा चालक रक्त देण्यासाठी येत होते. राजकुमार हे रक्त सप्लाय करत होता. ज्यांच्याकडून रक्त घेतलं जात होतं, त्यांना पैसे किंवा स्मॅक दिलं जात होतं असं सांगितलं आहे. जवळच राहणाऱ्या एका महिलेने सांगितलं की, 24 जून रोजी त्यांचा मुलगा सन्नीदेखील येथे आला होता. राजकुमारने त्याचं रक्त घेतलं होतं. यानंतर सनीला नीट चालताही येत नव्हतं. मात्र तेव्हापासून तो बेपत्ता आहे. 

सन्नीलाही स्मॅकचं व्यसन लागलं होतं. त्यामुळेच तो आपलं रक्त देण्यासाठी आला होता. स्थानिकांनी याबाबत पोलिसांना सूचना देताच त्यांनी छापेमारी करीत राजकुमारला अटक केली आहे. त्याच्या घरातून 37 यूनिट अवैध रक्त जप्त करण्यात आलं आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. सिव्हील सर्जन डॉ. एसके वर्मा यांनी त्यांना रक्ताच्या काळा धंद्याबाबत माहिती मिळताच त्यांनी तीन सदस्यीय टीम नेमली. पोलिसांसोबत जाऊन त्यांनी छापेमारी केली आणि राजकुमारला ताब्यात घेतलं. दुसरीकडे हनुमानबागमधील संजीव साह यालाही अटक करण्यात आली असून दोघांवर प्राथमिक तक्रार दाखल करीत त्यांना तुरुंगात पाठविण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

संतापजनक! लग्नानंतर 3 दिवसांतच सासरच्यांकडून नवविवाहितेला मारहाण; गुप्तांगावर गरम सळईने दिले चटके

लग्नानंतर तीन दिवसांतच नव्या नवरीला बेदम मारहाण केल्याची, तिचा मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुप्तांगावर गरम सळईने चटके देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशच्या बदायूमधील जरीफनगर येथे ही संतापजनक घटना घडली आहे. विवाहितेला अत्यंत क्रूर पद्धतीने मारहाण करण्यात आली आहे. बेदम मारहाणीमुळे तिच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या आहेत. गंभीर अवस्थेत असलेल्या विवाहितेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. विवाहितेच्या वडिलांनी तिचा पती आणि सासरच्या मंडळींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपल्या मुलीचा खूप छळ झाल्याचं म्हटलं आहे. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती आणि सासूसह कुटुंबातील सात सदस्यांविरोधात हुंड्यासाठी छळ आणि जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली आहे. 

Web Title: bihar news blood business caught in purnia two accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.