मंदिरातील पुजाऱ्यावर बेच्छूट गोळीबार, स्थानिकांच्या बेदम मारहाणीत एका आरोपीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 12:51 PM2021-10-14T12:51:08+5:302021-10-14T12:52:14+5:30

आज पहाटे 4.30 च्या सुमारास कंकाली मंदिरात ही घटना घडली, यादरम्यान दर्शन करण्यासाठी आलेल्या एका भक्तालाही गोळी लागली.

Bihar News; Darbhanga Kankali Temple Pujari Rajeev Jha Shot Dead By Four Criminals, One Killed By Mob | मंदिरातील पुजाऱ्यावर बेच्छूट गोळीबार, स्थानिकांच्या बेदम मारहाणीत एका आरोपीचा मृत्यू

मंदिरातील पुजाऱ्यावर बेच्छूट गोळीबार, स्थानिकांच्या बेदम मारहाणीत एका आरोपीचा मृत्यू

googlenewsNext

दरभंगा:बिहारच्यादरभंगामध्ये(Darbhanga) एका पुजाऱ्याची मंदिरात गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरभंगातील राज संकुलात असलेल्या कंकाली मंदिराचे मुख्य पुजारी राजीव कुमार झा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आज पहाटे 4.30 च्या सुमारास राजीव झा पूजा करत असताना हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, 4 हल्लेखोर कारमधून मंदिरात आले होते. मंदिरात प्रवेश करुन त्यांनी राजीव झा यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि पळ काढला. यादरम्यान दर्शन करण्यासाठी आलेल्या एका भक्तालाही गोळी लागली. या हल्ल्यानंतर पळून जात असताना स्थानिकांनी 3 हल्लेखोरांना पकडलं तर एक हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाला. स्थानिकांनी हल्लेखोरांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत एका हल्लेखोराचा मृत्यू झाला तर इतर दोघांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, जखमी भक्ताला पारस रुग्णालयात तर दोन आरोपींना डीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

पुतण्याच्या वादाची काकाला शिक्षा 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दारुबंदीनंतर संध्याकाळपासून मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात अमली पदार्थांचे व्यसन करण्यास गर्दी होते. त्यापैकी एकानं कॉल करण्यासाठी पुजाऱ्याच्या भाच्याकडे मोबाइल मागितला, जो पुजाऱ्याच्या भाच्यानं दिला नाही. यावरुन बुधवारी संध्याकाळी पुजाऱ्याच्या पुतण्याचे त्याच्यासोबत भांडण झाले होते. या वादादरम्यान पुजारी राजीव झा दोघांमधला वाद सोडवण्यासाठी आले पण हा वाद एकदम टोकाला गेला. याच वादामुळे झा यांच्यावर हल्ला झाल्याची पार्थमिक माहिती आहे.
 

Web Title: Bihar News; Darbhanga Kankali Temple Pujari Rajeev Jha Shot Dead By Four Criminals, One Killed By Mob

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.