किन्नर उषा राणी मर्डर केसचा झाला खुलासा, शारीरिक संबंध ठेवल्यावर दिला होता ड्रग्सचा ओव्हरडोज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 11:21 AM2022-01-25T11:21:39+5:302022-01-25T11:23:08+5:30
Patna Kinnar murder case revealed : गेल्यावर्षी २० डिसेंबरला पटणा सिटीच्या आलमगंजमध्ये किन्नर उषा राणीच्या संशयास्पद मृत्यू झाला होता. यानंतर पोलीस या केसची चौकशी करत होते.
बिहारची (Bihar) राजधानी पटणामध्ये (Patna) एका किन्नराच्या संशयास्पद मृत्यूचा (Kinnar Murder Case) खुलासा झाला आहे. किन्नराच्या मृत्यूमागील सत्य जाणून घेतल्यावर सगळेच हैराण झाले आहेत. या मृत्यूला कारणीभूत दुसरं तिसरं कुणी नाही तर किन्नर उषा राणीचा (Kinnar Usha Rani) प्रियकरच आहे. सोबतच अनैतिक संबंधाची अशी कहाणी समोर आली की, पोलिसही चक्रावून गेले.
गेल्यावर्षी २० डिसेंबरला पटणा सिटीच्या आलमगंजमध्ये किन्नर उषा राणीच्या संशयास्पद मृत्यू झाला होता. यानंतर पोलीस या केसची चौकशी करत होते. पोलिसांनी सोमवारी या हत्याकांडाचा खुलासा केला. पोलिसांनी किन्नरच्या मृत्यूला जबाबदार आरोपीला अटक केली.
किन्नरासोबत ठेवले संबंध
किन्नर उषा राणीचे नवीन कुमार उर्फ आशुतोषसोबत अनैतिक संबंध होते. दोघेही सोबत राहत होते. किन्नर उषा राणी नवीन कुमारच्या प्रेमात वेडी झाली होती. दोघेही दिवस आणि रात्र सोबत राहत होते. नवीन कुमारने २० डिसेंबरच्या दिवशीही उषा राणीसोबत शारीरिक संबंध ठेवला आणि त्यानंतर उषा राणीला ड्रग्सचा ओव्हरडोज दिला. ज्यामुळे उषा राणीचा मृत्यू झाला. पण नवीन कुमारला उषा राणीच्या मृत्यूचं जराही दु:खं झालं नाही. नवीनने उषाचे दागिने आणि पैशांवर हात साफ केले. त्यानंतर तो फरार झाला.
पिस्तुल आणि ड्रग्स
पोलिसांनी लांबलचक तपासानंतर आरोपी नवीन कुमारला विस्कोमान कॉलनीतून अटक केली. पोलिसांनुसार नवीन कुमार हा अपराधी वृत्तीचा होता. त्याच्याकडून एक पिस्तुल, दोन काडतूस आणि दोन मॅगझिन ताब्यात घेतले. सोबतच त्याच्याकडे ८२ ग्रॅम स्मॅक ड्रग्सही आढळून आलं.
आरोपीने मान्य केला आपला गुन्हा
आरोपी नवीनने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला. नवीनने सांगितलं की उषा राणीसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. तो उषा राणीसोबत लिव इनमध्ये राहून आपलं जीवन जगत होता. नवीनने सांगितलं की, त्याने अनेक किन्नरांसोबत संबंध ठेवले आहेत. तसेच त्यांच्यासोबत बसून तो ड्रग्सही घेतो. नवीननुसार आधी रिंकी किन्नरसोबत त्याचे संबंध होते. नंतर तो उषा राणीसोबत संबंध ठेवू लागला होता.
ठरवून केली हत्या
नवीन कुमार हे कबूल केलं की, किन्नर उषा राणीकडे भरपूर पैसा होता. ज्यामुळे त्याने उषा राणीला आपल्या जाळ्यात अडकवलं. नंतर उषा राणीचे दागिने आणि पैसे लुटण्यासाठी हळूहळू तिचा विश्वास संपादन केला. संधी बघून त्याने तिची हत्या केली. या हत्याकांडाचा खुलासा झाल्यावर आणि आरोपीला पकडण्यात आल्यावर किन्नर समाजाने पोलिसांचे आभार मानले.