'तिचे अनैतिक संबंध होते', मुलानेच आईवर झाडली गोळी; मग बिलगून रडू लागला...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 12:12 PM2022-07-07T12:12:56+5:302022-07-07T12:13:21+5:30
Bihar Crime News : 4 जुलैच्या रात्री जेव्हा इंदु देवी आपली बहीण आणि भाचीसोबत झोपली होती तेव्हा रात्री 11 वाजता ओमप्रकाश छतावरून आला आणि आपल्या आईच्या डोक्यावर त्याने गोळी झाडली.
Bihar Crime News : जो मुलगा आईच्या हत्येनंतर तिला बिलगून रडत होता. ज्याने जड मनाने आपल्या आईला मुखाग्नि दिली. त्याच मुलाला पोलिसांनी 24 तासात आईच्या हत्येप्रकरणी अटक केली. ही घटना बिहारची राजधानी पटणाच्या पिंपरा गावातील आहे.
पिंपरा गावातील महिलेची हत्या 4 जुलैच्या रात्री झाली होती. 40 वर्षीय महिला इंदु देवीचे पती राम लड्ड सिंहने 5 जुलै रोजी अज्ञात लोकांविरोधात तक्रार दाखल केली होती. पण जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा गुन्हेगार महिलेचा मुलगा ओमप्रकाशच निघाला. त्याला त्याची हत्या करण्यासाठी हत्यात त्याचे काका पिंटू सिंहने दिलं होतं.
पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं की, 4 जुलैच्या रात्री जेव्हा इंदु देवी आपली बहीण आणि भाचीसोबत झोपली होती तेव्हा रात्री 11 वाजता ओमप्रकाश छतावरून आला आणि आपल्या आईच्या डोक्यावर त्याने गोळी झाडली. गोळी झाडल्यानंतर तो गावातील मंदिरात बसून होता. जेव्हा पोलीस पोहोचले तेव्हा तो घरी आला आणि आईला बिलगून जोरजोरात रडू लागला.
गुन्हेगार कितीही हुशार असो, पण त्याच्या हावभावावरून समजून येतं. पोलिसांना तेव्हाच मुलावर संशय आला. गावातील लोकांच्या माहितीवरून पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलवलं. आधी तर पोलिसांना त्याने खोटं सांगितलं. नंतर सगळं सत्य सांगितलं.
ओमप्रकाशने सांगितलं की, तो त्याच्या आईच्या चारित्र्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून चिंतेत होता. त्याच्या आईचं गावातील एक व्यक्ती अनैतिक संबंध होते. ज्यावरून गावातील लोक चर्चा करत होते. समाजात बदनामी होत होती. त्यामुळे त्याने हत्या केली. त्याच्या काकाने त्याला हत्यार दिलं होतं. ओमप्रकाशने आपलं गुन्हा कबूल केला. पोलिसांनी पिंटू सिंह यालाही अटक केली.