सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 06:08 PM2020-08-06T18:08:57+5:302020-08-06T18:09:29+5:30
पोलीस प्रभारी यांच्या मार्गदर्शनाखाली चार सदस्यीय पथक या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई येथे गेले होते.
सुशांतचे वडील के के सिंग यांनी एफआयआर केल्यानंतर याप्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत गेलेली बिहारपोलिसांची टीम गुरुवारी म्हणजेच आज पाटणा येथे परतली. गेल्या 11 दिवसांत बिहारपोलिसांच्या पथकाने सुशांत सिंग राजपूत यांच्या बँक खात्यांचा तपास केला आणि सुमारे 12 जणांची चौकशी केली. सुशांतच्या वडिलांनी राजधानी पाटणातील राजीव नगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केल्याची माहिती आहे. यानंतर पोलीस प्रभारी यांच्या मार्गदर्शनाखाली चार सदस्यीय पथक या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई येथे गेले होते.
नंतर पाटणा माढ्याचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी हे अजूनही मुंबईत क्वारंटाईन आहेत. आयपीएस अधिकारी विनय तिवारी हे सुटकेसाठी मुंबईत धरणे आंदोलनवर बसले आहेत. त्यांचा निषेध सुरूच आहे. मुंबईला पोहोचताच, महापालिकेने त्यांना क्वारंटाईन केले होते. गेल्या चार दिवसांपासून ते क्वारंटाईन आहे.
असे म्हणतात की, सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविल्यानंतर बिहार पोलिसांची टीम आता बिहार सरकारला आपला संपूर्ण अहवाल सादर करेल. या अहवालाच्या आधारे, बिहार सरकार सर्वोच्च न्यायालयात आपले उत्तर दाखल करेल. बिहार पोलिसांच्या पथकाला मुंबई पोलिसांकडून कोणतेही सहकार्य मिळाले नसल्याची माहिती आहे. असे असूनही, बिहार पोलिसांच्या पथकाने तपास सुरू ठेवला आणि गेल्या 11 दिवसांत बिहार पोलिसांच्या चार सदस्यांच्या पथकाने या प्रकरणात सुमारे 12 जणांची चौकशी केली.
सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीदरम्यान, बिहार सरकार आयपीएस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याचा मुद्दा काढू शकेल अशी आशा आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सुनावणीदरम्यान मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना क्वारंटाईन करून चांगला संदेश दिलेला नाही, अशी नाराजी व्यक्त केली होती.
Patna: Four officers of Bihar Police including the Investigating Officer, who were in Mumbai to probe Sushant Singh Rajput death case, return to the state.
— ANI (@ANI) August 6, 2020
Patna (Central) Superintendent of Police (SP) Vinay Tiwari continues to be quarantined in #Mumbai. pic.twitter.com/UzwrDG3Y1k
#WATCH IPS #VinayTiwari has still not be exempted from quarantine, it is like house arrest. We 'll decide what action to take after consultation with the advocate general. Going to the court is also an option, says #Bihar DGP Gupteshwar Pandey pic.twitter.com/Or94KTCsDR
— ANI (@ANI) August 6, 2020
अन्य महत्वाच्या बातम्या...
अर्णब गोस्वामीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार, अटक करण्याची मागणी
रक्षाबंधनसाठी माहेरी आलेली महिला, प्रियकराने गोळ्या घालून केली हत्या
संगमनेरात बजरंग दलाचे पदाधिकारी ताब्यात
...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!
Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन