लग्नाच्या सहा महिन्यांनंतर मिळाली होती जन्मठेपेची शिक्षा, आता अपत्य प्राप्तीसाठी मिळाली १५ दिवसांची सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 12:38 PM2021-04-21T12:38:13+5:302021-04-21T12:41:03+5:30
२०१२ मध्ये विक्कीला हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हाापासून तो बिहारच्या शरीफ तुरूंगात शिक्षा भोगत आहे.
अपत्य जन्माला घालण्यासाठी एका कैद्याला तुरूंगातून पॅरोलवर सुट्टी मिळाली आहे. अशी घटना कधी ऐकली नसेल पण हे खरं आहे. कायद्यानुसार, पॅरोलच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही अनोखी घटना बिहारच्या शरीफ तुरूंगातील आहे. इथे हत्येच्या आरोपात कैद असलेल्या एका कैद्याला हायकोर्टाने अपत्य जन्माला घालण्यासाठी १५ दिवसांच्या पॅरोलवर सोडण्याचा आदेश दिला आहे.
विक्की कुमार नावाचा कैदी नालंदाच्या रहुई भागातील उतरनावा गावातील राहणारा आहे. २०१२ मध्ये विक्कीला हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हाापासून तो बिहारच्या शरीफ तुरूंगात शिक्षा भोगत आहे.
तेच बिहारच्या शरीफ तुरूंगाचे विजिटर देवेंद्र शर्मा अधिवक्ता यांच्या सल्ल्याने विक्कीची पत्नी रंजीता पटेलने हायकोर्टात अपत्यासाठी याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर सुनावणी करत हायकोर्टाने अपत्य जन्माला घालण्यासाठी १५ दिवसांच्या पॅरोलवर विक्कीला सोडण्याचा आदेश दिला. (हे पण वाचा : धक्कादायक! प्रेयसीच्या घरासमोर प्रियकराचा आगीत जळून मृत्यू, विवाहित महिलेच्या कुटुंबियांवर आरोप...)
इकडे हायकोर्टाच्या आदेशाची माहिती बिहार शरीफ तुरूंगाचे अधिक्षकांना मिळाली आहे. सोबतच या प्रकरणात देवेंद्र शर्मा यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. त्यांच्या सल्ल्यानुसारच मिळालेल्या आदेशामुळे विक्की कुमार आणि त्याची पत्नी आनंदी आहे. तेच देवेंद्र शर्मा यांनी सांगितले की, विक्की कुमार लग्नाच्या ६ महिन्यानंतर हत्येप्रकरणी तुरूंगात गेला होता.
तुरूंगात भेटीदरम्यान विक्कीने त्यांना त्याची व्यथा सांगितली होती. यानंतर देवेंद्र शर्माच्या सल्ल्यावर पत्नीने याचिका दाखल केली होती. त्यानुसार हायकोर्टाने विक्की कुमारला अपत्य प्राप्तीसाठी पॅरोलवर सोडण्याचा आदेश दिला.