मुलीच्या प्रेम विवाहाला आईचा विरोध; सासूने जावयाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 04:24 PM2023-07-11T16:24:10+5:302023-07-11T16:24:56+5:30

या घटनेतील पीडित 75 टक्के भाजला असून, रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

bihar-vaishali-mother-in-law-burns-son-in-law-by-sprinkling-petrol | मुलीच्या प्रेम विवाहाला आईचा विरोध; सासूने जावयाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले

मुलीच्या प्रेम विवाहाला आईचा विरोध; सासूने जावयाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले

googlenewsNext

पाटणा : सासू आपल्या जावयावर मुलापेक्षा जास्त प्रेम करते, असे तुम्ही ऐकले असेल. बिहारमध्ये तर जावयाच्या स्वागताच्या कहाण्या सगळ्यांनी ऐकल्या असतील. पण, आता याच बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने आपल्या जावयाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. महिलेला जावई आवडत नव्हता, म्हणून तिने त्याच्यावर पेट्रोल टाकून पेटवले.

या घटनेत जावई गंभीरपणे भाजला असून, पाटणा पीएमसीएचमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. ही घटना प्रकरण वैशाली जिल्ह्यातील आहे. विकास कुमार असे जावयाचे नाव आहे. तो मुझफ्फरपूरच्या कर्जा पोलीस स्टेशन हद्दीतील बसंतपूर गावातील रहिवासी आहे. विकासने गेल्या वर्षी मे महिन्यात पाटेधी पोलीस स्टेशन हद्दीतील कर्णेजी गावातील नेहा कुमारीशी लग्न केले होते. दोघांनी प्रेमविवाह केला होता, त्यामुळे मुलीची आई नाराज होती. 

आई मुलीला सासरी जाऊ देत नव्हती
या लग्नामुळे मुलीचे आई-वडील खुश नव्हते. गोर्‍या मुलीला काळा नवरा मिळाल्याने तिला राग यायचा. लग्नाला एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरी आरोपी महिलेने जावयाला स्वीकारले नाही. इकडे नेहा आणि विकासचे आयुष्य सुरळीत चालू होते. नेहाला दिवस गेल्यामुळे ती माहेरी गेली. तिचा पती विकास तिला घेण्यासाठी आला, पण मुलीच्या घरच्यांनी त्याच्यासोबत वाद घातला. 

पीडित विकासने सांगितले की, तो आई आणि वडिलांसोबत पत्नीला भेटायला गेला होता. मात्र सासरच्यांनी नेहाला पाठवण्यास नकार दिला आणि शिवीगाळ करुन पळवून लावले. तो घरी परतल्यानंतर त्याच्या पत्नीने त्याला फोन करून परत बोलावले. तो सासरी गेला असता सासूने त्याच्यावर पेट्रोल शिंपडून पेटवून दिले. यानंतर विकासला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, परिस्थिती गंभीर असल्याने त्याला पीएमसीएच पाटणा येथे रेफर करण्यात आले. विकास 75 टक्के जळाला आहे.

Web Title: bihar-vaishali-mother-in-law-burns-son-in-law-by-sprinkling-petrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.