पती परदेशात गेल्यावर एका व्यक्तीच्या प्रेमात पडली सहा मुलांची आई, सुपारी देऊन केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 10:41 AM2023-05-25T10:41:01+5:302023-05-25T10:41:24+5:30
Crime News : लाढपूर गावात मासे व्यावयासिक ईश मोहम्मद मियां याची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या केसबाबत एसआयटीने खळबळजनक खुलासा केला आहे.
Crime News : सहा मुलांच्या आईच्या डोक्यात प्रेमाच भूत असं काही शिरलं की, तिने आपल्या पतीची हत्या घडवून आणली. आपल्या प्रियकराच्या मदतीने तिने पतीची हत्या केली. हत्येची सुपारी देण्यासाठीही तिने पतीच्या पैशांचा वापर केला. लव्ह, सेक्स आणि धोका थीम असलेली ही घटना बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील आहे.
लाढपूर गावात मासे व्यावयासिक ईश मोहम्मद मियां याची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या केसबाबत एसआयटीने खळबळजनक खुलासा केला आहे. एसआयटीच्या खुलाशात पत्नीने पतीची हत्या केली. प्रियकराच्या प्रेमात वेडी झालेल्या पत्नीने पतीच्या पैशांनीच काही लोकांना 50 हजार रूपयांमध्ये हत्येची सुपारी दिली.
या हत्येप्रकरणी एसआयटीने पत्नी, तिचा प्रियकर आणि दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून हत्येसाठी वापरण्यात आलेली पिस्तुल आणि काही काडतुस ताब्यात घेण्यात आले आहेत. चौकशी दरम्यान महिलेने आपला गुन्हा कबूल केला.
एसपी स्वर्ण प्रभात यांनी सांगितलं की, नूरजहां खातून सहा मुलांची आई आहे. तिचा पती ईश मोहम्मद मियां परदेशातून येऊन माशांचा व्यवसाय करत होता. तीन मुली आणि तीन मुलांपैकी एका मुलीचं लग्न झालं आहे. पण पत्नी शेजारील गावातील नौशाद आलमच्या प्रेमात पडली होती. दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. ज्याची माहिती पतीला मिळाली होती.
महिलेच्या पतीने या अनैतिक संबंधाचा अनेकदा विरोध केला आणि पत्नीला मारहाणही केली. ज्यानंतर नाराज होऊन पत्नी प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचा प्लान केला. 22 मे रोजी त्याची हत्या केली. त्यानंतर एसआयटीने एक टीम तयार केली. ज्यानंतर चौकशीदरम्यान हा सगळा खुलासा झाला.
चौकशीतून समोर आलं की, मृत ईश मोहम्मद सहा मुलांचा पिता झाल्यानंतर आर्थिक स्थिती ठीक करण्यासाठी परदेशात गेला. पती परदेशात गेल्यामुळे पत्नी एकटी जगत होती आणि अशात तिची भेट नौशाद आलमसोबत झाली. ती नौशादला घरी बोलवत होती आणि त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होती. पती परत आला तेव्हा त्याला याची खबर मिळाली. त्याने याचा विरोध केला. पण याच कारणाने त्याचा मृत्यू झाला.