जेवण न करताच झोपला पती, संतापलेल्या पत्नीने क्रिकेट बॅटने केली मारहाण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 02:09 PM2022-07-14T14:09:00+5:302022-07-14T14:09:21+5:30

Rajasthan Crime News : जेवण न पती झोपल्याने पत्नी इतकी संतापली की, तिने क्रिकेटच्या बॅटने पतीची धुलाई केली. पत्नी पतीला इतकं मारलं की, त्याला एका डझनापेक्षा जास्त टाके लावावे लागले.

Bikaner woman beats husband with bat family protest | जेवण न करताच झोपला पती, संतापलेल्या पत्नीने क्रिकेट बॅटने केली मारहाण...

जेवण न करताच झोपला पती, संतापलेल्या पत्नीने क्रिकेट बॅटने केली मारहाण...

Next

Rajasthan Crime News : राजस्थानच्या बिकानेरमधून पती-पत्नीचा वाद इतका वाढला की, रागावलेल्या पत्नीने  क्रिकेट बॅटने मारून मारून पतीला अर्धमेलं केलं. याप्रकरणी पोलिसांनी पीडित पती आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात एकतर्फी कारवाई केली. ज्याचा लोकांनी विरोध केला. या घटनेचा हैराण करणारा व्हिडीओ समोर आला आहे.

जेवण न पती झोपल्याने पत्नी इतकी संतापली की, तिने क्रिकेटच्या बॅटने पतीची धुलाई केली. पत्नी पतीला इतकं मारलं की, त्याला एका डझनापेक्षा जास्त टाके लावावे लागले. इतकंच नाही तर शेजाऱ्यांनी आणि कुटुंबातील लोकांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला तरी तिचा राग शांत झाला नाही. तिच्याकडून हिसकावून घेतलेली बॅट तिने पुन्हा घेतली आणि अर्धमेल्या पतीवर तिने पुन्हा हल्ला केला.

पीडित पतीच्या कुटुंबियांचा आरोप आहे की, महिलेविरोधात पती अमीन याने पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. पण पोलीस पत्नीकडून पती आणि त्याच्या कुटुंबियांना छेडछाडीच्या केसमध्ये अटक करण्याची धमकी दिली जात आहे. 

पोलिसांच्या या कारवाईनंतर पीडित पती आणि त्याच्या कुटुंबियांनी बिकानेरच्या एसपीकडे न्यायाची मागणी केली आहे. पीडित पतीच्या कुटुंबियांनी सांगितलं की, तो झोपला होता, तेव्हाच त्याच्यावर मागून हल्ला केला गेला, कमीत कमी त्याला 15 टाके लागले. आमच्याकडे पुरावा म्हणून व्हिडीओ आहे. पोलीस यावर कारवाई करत नाहीयेत.

पीडित पतीच्या कुटुंबियांचा आरोप आहे की, पोलिसांनी काहीच केलं नाही. उलट आमच्यावर लगेच केस झाली. त्यात चारही भावांचं नाव आलं आहे. चार शेजाऱ्यांचं नाव आहे. 

Web Title: Bikaner woman beats husband with bat family protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.