दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोन अल्पवयीन मुलांसह चौघे ताब्यात, २२ दुचाकी जप्त
By सोमनाथ खताळ | Published: July 31, 2023 11:20 PM2023-07-31T23:20:44+5:302023-07-31T23:30:03+5:30
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी केली.
बीड : राज्यासह परराज्यातील दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दोन अल्पवयीन मुलांसह चार चोरट्यांना पकडले असून त्यांच्याकडून २२ दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी केली.
गोकुळदास मगर बोरसे, धर्मराज कल्याण बोरसे व दोन अल्पवयीन (सर्व रा.बाभुळखंटा ता.जि.बीड) असे पकडलेल्या चोरट्यांची नावे आहेत. या चोरट्यांनी जिल्ह्यासह जालना, पुणे, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातूनही दुचाकी पळविल्या. ही टोळी एवढ्यावरच थांबली नसून कर्नाटक राज्यातूनही अनेक दुचाकींची चोरी केली आहे.
या चोरट्यांची माहिती मिळाल्यानंतर एलसीबीने सापळा रचून या सर्वांना पकडले. त्यांच्याकडून आतापर्यंत २२ दुचाकी जप्त केल्या आहेत. या चोरट्यांना शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष साबळे, उपनिरीक्षक संजय तुपे, तुळशिराम जगताप, नसिर शेख, विलास ठोंबरे, अशोक दुबाले, राहुल शिंदे, भागवत शेलार, विकी सुरवसे, सतिष कातखडे, बप्पासाहेब घोडके, गणेश मराडे आदींनी केली.
नागरिकांनो, तुमची दुचाकी ओळखा...
या २२ दुचाकींमध्ये १७ दुचाकींचे नंबर समोर आले आहेत. यामध्ये एमएच २३ एएच ६५५५, एमएच २३ एी ५०४७, एमएच ४४ व्ही ८१९९, एमएच ४४ व्ही ९८६८, एमएच २३ एएम ७२६२, एमएच २३ बीबी ६९९२, एमएच २३ एमएम ३२६०, एमएच ११ सीएल २५३९, एमएच १४ डीपी ९०२३, एमएच १२ टीएक्स ६७१७, एमएच २३ एझेड ०३७८, एमएच १२ एसजी १०८२, एमएच १३ डीएच ५१५२, एमएच २१एके ७९६६, एमएच १६ बीटी ८०६८, एमएच २० एफडी १६०८, केए २९ ईजे ५१४९ या क्रमांकाच्या गाड्या चोरट्यांकडून जप्त केल्या आहेत. जर कोणाच्या असतील तर संबंधित पोलिस ठाणे किंवा एलसीबीशी संपर्क साधावा.