स्टिरॉइड खरेदी-विक्रीचे अर्थकारण कोट्यवधींचे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 07:19 AM2022-12-15T07:19:51+5:302022-12-15T07:20:18+5:30

अनेक आजारांमध्ये उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून स्टिरॉइडचा वापर केला जातो. हा वापर रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी असतो.

Billions of dollars in steroid trading | स्टिरॉइड खरेदी-विक्रीचे अर्थकारण कोट्यवधींचे

स्टिरॉइड खरेदी-विक्रीचे अर्थकारण कोट्यवधींचे

googlenewsNext

- उद्धव गोडसे 
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टिरॉइडचे इंजेक्शन किंवा गोळ्यांची विक्री करणे बेकायदा असतानाही प्रत्यक्षात मात्र अवैधपणे स्टिरॉइडच्या खरेदी-विक्रीतून दर महिन्याला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. ऑनलाइन स्टिरॉइड विक्रीचीही यात भर पडली आहे. स्टिरॉइडची अवैध विक्री आणि गैरवापरावर कोणाचेच नियंत्रण नसल्यानेच ही समस्या चिंताजनक बनत आहे. 

अनेक आजारांमध्ये उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून स्टिरॉइडचा वापर केला जातो. हा वापर रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी असतो. मात्र, स्टिरॉइडच्या वापराबद्दल अज्ञान असणाऱ्या अनेकांकडून त्याचा गैरवापर केला जातो. याच अज्ञानाचा गैरफायदा घेऊन स्टिरॉइड विक्रीचे रॅकेट सक्रिय झाले आहेत. स्टिरॉइडची ऑनलाइन विक्री करून अनेक कंपन्या कोट्यवधी रुपयांची कमाई करीत आहेत. शरीरसौष्ठव, भारोत्तोलन, कुस्ती यासह अनेक खेळांमधील खेळाडू स्टिरॉइडचा वापर करीत असल्याची धक्कादायक माहिती यापूर्वीही उघडकीस आली आहे. आता तर पोलिस भरती, सैन्य भरती प्रक्रियेत धावण्याच्या चाचणीवेळी स्टिरॉइड वापराचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. 

हे आहेत धोके 
nस्टिरॉइडमुळे शरीरात तात्पुरती ऊर्जा निर्माण होते. nत्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त ताण वाढतो. nओव्हरडोसमुळे व्यक्ती बेशुद्धावस्थेत जाते. nस्टिरॉइडच्या अतिवापरामुळे हाडे ठिसूळ होतात. nयकृताच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. स्नायू ताठर बनतात. nअचानक वजन कमी होणे, अशक्तपणा वाढणे, भूक मंदावणे, असे अनेक धोके निर्माण होतात. 

तपास गतिमान 
अग्निवीर सैन्य भरतीदरम्यान कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर आढळलेल्या स्टिरॉइडच्या इंजेक्शन्सप्रकरणी तपास गतिमान झाल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त आश्विन ठाकरे यांनी दिली. पोलिस आणि अन्न औषध प्रशासनाकडून संयुक्त तपास सुरू असून, काही तरुणांकडे चौकशी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 

Web Title: Billions of dollars in steroid trading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.