जन्मदात्या आईनेच दोन चिमुरड्यांना सुरी गरम करुन दिले चटके; पोलिसांनी महिलेला घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 19:49 IST2020-08-20T19:45:36+5:302020-08-20T19:49:00+5:30
ही बाब लक्षात येताच शेजारी राहणाऱ्यांनी महिलेला जाब विचारला असता तिने मेरे बच्चे है मै कुछ भी करुगी असे उद्धट उत्तर दिले.

जन्मदात्या आईनेच दोन चिमुरड्यांना सुरी गरम करुन दिले चटके; पोलिसांनी महिलेला घेतलं ताब्यात
मुंब्रा - जन्मदात्या आईनेच दोन चिमुरड्यांना चटके दिल्याची खळबळजनक मुंब्य्राजवळील दहिसर मोरी येथे घडली. ठाकुरपाडा परीसरातील स्टार चाळीत रहात असलेल्या फिरदोस या महिलेने तिच्या एक वर्षाची मुलगी आणि अडीच वर्षाच्या मुलाला सुरी गरम करुन त्यांच्या हातावर,पायावर आणि पाठणीवर चटके दिले.
ही बाब लक्षात येताच शेजारी राहणाऱ्यांनी महिलेला जाब विचारला असता तिने मेरे बच्चे है मै कुछ भी करुगी असे उद्धट उत्तर दिले. या घटनेची माहिती मिळताच शिळ-डायघर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून,कायदेशीर कारवाई करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती वरीष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी लोकमतला दिली. यापूर्वीही काही दिवसांपूर्वी ती मुलांना घरात कोंडून गेली होती. तीच्या या कृत्याला विरोध करणाऱ्याविरुद्ध ती रात्री अपरात्री दरवाजा ठोकत असल्याचा आरोप करते,अशी माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.