बर्थडे बॉयला वाढदिवसाचे सेलिब्रेशन महागात! हातात शोभेचा पाऊस, अन डोक्यावर पीठ टाकल्याने उडाला भडका आणि..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 11:52 AM2022-04-13T11:52:50+5:302022-04-13T12:49:57+5:30

Crime News: एका तरुणाचा वाढदिवस साजरा केला जात असताना हे विचित्र सेलिब्रेशन बर्थडे बॉयच्या चांगलंच अंगाशी आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

Birthday Boy's Birthday Celebration Expensive! Rain of ornaments in hand, throwing flour on head and erupted and .. | बर्थडे बॉयला वाढदिवसाचे सेलिब्रेशन महागात! हातात शोभेचा पाऊस, अन डोक्यावर पीठ टाकल्याने उडाला भडका आणि..

बर्थडे बॉयला वाढदिवसाचे सेलिब्रेशन महागात! हातात शोभेचा पाऊस, अन डोक्यावर पीठ टाकल्याने उडाला भडका आणि..

Next

अंबरनाथ - एका तरुणाचा वाढदिवस साजरा केला जात असताना हे विचित्र सेलिब्रेशन बर्थडे बॉयच्या चांगलंच अंगाशी आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तरुणाच्या डोक्यावर पीठ टाकल्याने शोभेच्या पावसाच्या आगीमुळे या पीठाने पेट घेतला आणि त्या तरुणाचा चेहरा भाजला आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडिओ अंबरनाथच्या बुवापाडा परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये राहुल नावाच्या एका तरूणाचा वाढदिवस साजरा केला जात होता. यासाठी केकवर हल्ली वापरला जाणारा शोभेचा पाऊस लावण्यात आला. तर असाच शोभेचा पाऊस पेटवून या तरुणाच्या तोंडात धरण्यासाठी देण्यात आला. यानंतर या तरुणावर अंडी फेकून मारण्यात आली. त्यामुळे तोंडातील जळत असलेला शोभेचा पाऊस या तरुणाने हातात पकडला. याचवेळी या तरुणाच्या अंगावर त्याच्या एका मित्राने पीठ टाकले. मात्र यामुळे आगीचा मोठा भडका उडाला, ज्यात बर्थडे बॉय चांगलाच होरपळून निघाला. या घटनेबाबत अंबरनाथ पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. राहुल नावाचा हा तरुण बुवापाडा परिसरात नेमका कुठे राहतो? हे अद्याप समजू शकलेले नसून या व्हिडिओनंतर हल्लीच्या तरुणांची वाढदिवस साजरा करण्याची विचित्र पद्धत जीवावरही कशी बेतू शकते? हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Web Title: Birthday Boy's Birthday Celebration Expensive! Rain of ornaments in hand, throwing flour on head and erupted and ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.