वाढदिवसाला आलेल्या मुलीची छेड काढली; तीन मुलांना अटक

By राजकुमार जोंधळे | Published: September 28, 2024 11:10 PM2024-09-28T23:10:33+5:302024-09-28T23:10:44+5:30

पोलिसांनी तिघांना अटक केली असून, न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

Birthday girl teased; Three children arrested, incident in Latur | वाढदिवसाला आलेल्या मुलीची छेड काढली; तीन मुलांना अटक

वाढदिवसाला आलेल्या मुलीची छेड काढली; तीन मुलांना अटक

लातूर : ‘तुझा मोबाइल नंबर माझ्या मोबाइलवर डायल करून दे’ म्हणत एका १६ वर्षीय मुलीची छेड काढल्याप्रकरणी लातुरातील गांधी चौक पोलिस ठाण्यात तिघांविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

पोलिसांनी सांगितले, पीडित अल्पवयीन मुलीच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता. तिने वाढदिवसाला बोलावले होते. या वाढदिवसाचे आयोजन लातुरातील गंजगोलाई परिसरातील एका कॅफेत करण्यात आले होते. मैत्रिणीचा वाढदिवस असल्याने ती कुटुंबीयांना सांगून कॅफेत दाखल झाली. यावेळी कॅफेत वाढदिवसाला हजर असलेल्या तिघांमधील एकाने पीडितेला ‘तुझा मोबाइल नंबर माझ्या मोबाइलमध्ये डायल कर’ असा आग्रह केला असता, पीडित मुलीने याला विरोध केला. 

तिघांपैकी एकाने तिच्यासोबत जबरदस्ती केली. या प्रकारावरून वाद निर्माण झाला. आपल्यासोबत घडलेला प्रकार पीडित मुलीने कुटुंबीयांना सांगितला. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुरनं. ६२७/२०२४ कलम ७५ (१) २, ४९, बीएनएस, ३ (१) पोक्सो कायद्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी केली तिघांनाही अटक!
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने शाहीद शेख, अल्ताफ शेख आणि जमीर शेख यास अटक केली. त्यांना शनिवारी लातूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
-डॉ. अजय देवरे, अपर पोलिस अधीक्षक, लातूर

Web Title: Birthday girl teased; Three children arrested, incident in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.