ना कोरोनाची चिंता...ना नियमांची भीती! बर्थडे पार्टीत डान्सरला बोलावून पैशांची उधळण; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 04:20 PM2021-10-09T16:20:52+5:302021-10-09T16:24:13+5:30

Birthday party video : बर्थडे पार्टीत डान्सरला बोलावून पैशांची उधळण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

birthday party video in surat bhagatalao goes viral 7 arrested for violating night curfew | ना कोरोनाची चिंता...ना नियमांची भीती! बर्थडे पार्टीत डान्सरला बोलावून पैशांची उधळण; Video व्हायरल

ना कोरोनाची चिंता...ना नियमांची भीती! बर्थडे पार्टीत डान्सरला बोलावून पैशांची उधळण; Video व्हायरल

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णाच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. देशभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी याचे पालन होत नसल्याचं पाहायला मिळत आहे. सूरतमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. कोरोना नियमावलीची एैशीतैशी अन् सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला आहे. बर्थडे पार्टीत डान्सरला बोलावून पैशांची उधळण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सूरतमध्ये ही घटना घडली आहे. नाईट कर्फ्यूचं आणि पोलीस आयुक्तांच्या अधिसूचनेचं उल्लंघन करण्यात आलं आहे. भागातलाव जनता मार्केटमध्ये काही लोकांनी बर्थडे पार्टीसाठी एका डान्सरला बोलावलं होतं. तसंच या पार्टीत पैसे उडवल्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. ही बर्थडे पार्टी अठवा पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर सुरू होती. ज्यात कोरोना नियमांचा फज्जा उडवण्यात आलेला दिसून आला. सरकार आणि पोलिसांच्या कारवाईवरही लोकांनी आता सवाल उपस्थित केला आहे. 

व्हिडिओचा तपास सुरू करुन कारवाई करण्यास सुरुवात

बर्थडे पार्टीचा व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी व्हायरल व्हिडिओचा तपास सुरू करुन कारवाई करण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान असं समोर आलं की, हा व्हिडिओ 5 दिवसांपूर्वीचा आहे. ज्यामध्ये नानपुरा खंडेरापुरा येथील रहिवासी उहैद आपल्या एक वर्षाच्या मुलीचा बर्थडे साजरा करत आहे. या पार्टीमध्ये एक मोठा स्टेज उभारण्यात आला होता, ज्यावर एका प्रोफेशनल डान्सरला डान्स करण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. या व्हिडिओमध्ये सुकरी आणि मिंडी गँगचे सदस्यही दिसत आहेत. 

कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल

पोलिसांनी तपास करुन व्हिडीओचे लोकेशन शोधून काढलं आणि त्यात दिसणाऱ्या लोकांचा शोध घेतला आहे. त्यानंतर पोलिसांनी नानपुरा खंडेरापुरा येथील रहिवासी, उहैद शेख, कैझर शेख, फवाद शेख, उवैश कुंभार, तुफैल कुंभार, मोहम्मद ईशा शेख आणि अनस फकीर अंग्रेज यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांवर कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर आरोपी, डान्सर आणि डीजेची चौकशी सुरू आहे. लवकरच पोलीस त्यांच्यावरही काही कारवाई करण्याची शक्यता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Read in English

Web Title: birthday party video in surat bhagatalao goes viral 7 arrested for violating night curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.