भाजपा नगरसेविकेच्या मुलाने केला आत्महत्येचा प्रयत्न, वडिलांकडील पिस्तुलाने स्वत:वर झाडून घेतली गोळी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 11:47 PM2021-03-28T23:47:31+5:302021-03-28T23:48:16+5:30
(BJP corporator's son attempts suicide in Pimpari : वडिलांच्या पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून भाजप नगरसेविकेच्या मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला.
पिंपरी - वडिलांच्या पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून भाजप नगरसेविकेच्या मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला. (Crime News) चिंचवडे नगर, चिंचवड येथे रविवारी (दि. २८) रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली. (BJP corporator's son attempts suicide, shot himself by father's pistol)
प्रसन्ना शेखर चिंचवडे (वय २१, रा. चिंचवडेनगर, चिंचवड), असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रसन्ना हा भाजप नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे यांचा मुलगा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसन्ना याने कुटुंबियांसमवेत रविवारी रात्री जेवण केले. त्यानंतर तो त्याच्या खोलीत गेला. त्यानंतर गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यामुळे घरातील सदस्यांनी त्याच्या खोलीकडे धाव घेतली असता तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्याला उपचारासाठी त्वरित थेरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रसन्नाचे वडील शेखर चिंचवडे यांच्याकडे परवानाधारक पिस्तूल आहे. याच पिस्तुलातून त्याने गोळी झाडून घेतली आहे. मात्र गोळी झाडून घेण्याचे कारण समजू शकलेले नाही.