भाजप नेत्याची गोळी झाडून आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट; पोलीस तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 06:35 AM2022-10-12T06:35:55+5:302022-10-12T06:36:10+5:30

भगीरथ बियाणी हे अनेक वर्षांपासून भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. सोमवारी ते मुंबईला निघाले हाेते.

BJP leader bhagirath biyani commits suicide by shooting; The cause is still unclear; Police investigation started | भाजप नेत्याची गोळी झाडून आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट; पोलीस तपास सुरू

भाजप नेत्याची गोळी झाडून आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट; पोलीस तपास सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क   
बीड : भाजपचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरी  रिव्हाॅल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केल्याचे मंगळवारी उघड झाले. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

भगीरथ बियाणी हे अनेक वर्षांपासून भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. एमआयडीसी भागात त्यांचे घर आहे. सोमवारी ते मुंबईला निघाले हाेते. मात्र, मळमळ, उलटीचा त्रास होत असल्याने ते घरी परतले. कुटुंबाशी गप्पा मारल्यानंतर ते झोपण्यासाठी गेले. मंगळवारी उठल्यानंतर पत्नीने त्यांना चहा दिला. नंतर त्यांनी खोलीचा दरवाजा आतून लावून घेतला. खूप वेळ झाला पण दरवाजा उघडत नसल्याने कुटुंबीय खोलीत गेले असता भगीरथ रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. 

कुटुंबीयांना धक्का
बियाणी यांच्या घरी लग्न आयोजित करण्यात आले होते, त्याची जोरदार तयारी सुरू होती. सर्व काही सुरळीत असताना भगीरथ यांनी आत्महत्या केली. यामुळे बियाणी कुटुंबीयांना धक्का बसला आहे. कोणत्या कारणामुळे भगीरथ यांनी हे टाेकाचे पाऊल उचलले, याबद्दल त्यांचे सारे कुटुंबीयही अनभिज्ञ आहेत.  

रुग्णालयात गर्दी
भगीरथ बियाणी यांच्या आत्महत्येची माहिती समजताच खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालयात एकच गर्दी केली होती.

Web Title: BJP leader bhagirath biyani commits suicide by shooting; The cause is still unclear; Police investigation started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा