धक्कादायक! जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भाजपा पदाधिकाऱ्यासह पत्नीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 08:38 PM2021-08-09T20:38:53+5:302021-08-09T20:40:26+5:30
Terrorist attack in Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्या दोघांचाही मृत्यू झाला.
जम्मू-काश्मीर येथील अनंतनागमधील लाल चौकात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात एका दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. गुलाम रसूल डार आणि जव्हारा बानो अशी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. गुलाम रसूल डार हे कुलगामचे भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष आणि रेडवीनी बाला येथील सरपंच होते. दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्या दोघांचाही मृत्यू झाला.
भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष गुलाम रसूल डार यांनी गेल्या वर्षी जिल्हा विकास परिषदेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. जम्मू-काश्मीरचेभाजपा प्रवक्ते अल्ताफ ठाकूर यांनी या दाम्पत्यावरील हल्ल्याचा निषेध केला. त्याचप्रमाणे हा हल्ला म्हणजे एक भ्याड कृत्य असून पोलिसांनी गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. पुढे अल्ताफ ठाकूर म्हणाले की, निष्पाप लोकांवर हल्ला करणं आणि मारणं आम्ही खपवून घेणार नाही.
#UPDATE | Gulam Rasool Dar, Kulgam BJP Kisan Morcha president, and his wife died in an attack by terrorists in Anantnag: Jammu & Kashmir BJP leader Altaf Thakur
— ANI (@ANI) August 9, 2021
(Visuals from the spot, deferred by unspecified time) pic.twitter.com/1bV80iKFKb
सलाईनच्या बाटलीत सायनाईड टाकलं! पतीनं पत्नीला जीवे मारलं; महिन्याभरानं पोलिसांना कळलंhttps://t.co/Mbr42ZffeQ
— Lokmat (@MiLOKMAT) August 9, 2021