हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 08:05 PM2024-11-02T20:05:09+5:302024-11-02T20:20:57+5:30
हिट अँड रन प्रकरणात बीएमडब्ल्यू चालवणारा अजमतुल्लाहचे वडील हमीदुल्लाह यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
हिट अँड रन प्रकरणात बीएमडब्ल्यू चालवणारा अजमतुल्लाहचे वडील हमीदुल्लाह यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. या अपघातातील आरोपी हनी उर्फ अजमतुल्लाह खान याचा पोलीस शोध घेत आहेत, घटनेनंतर तो फरार आहे. या संदर्भात आता पोलिसांनी आरोपीचे वडील आणि भाजपा नेते बब्बू खान म्हणजेच हमीदुल्लाह यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
मृत्यू झालेल्या रामलालच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, अपघाताच्या वेळी हमीदुल्लाह हे आरोपी हनीसोबत बीएमडब्ल्यू कारमध्ये होते. रामलालच्या मृत्यूनंतर दोघेही घरातून पळून गेले, या प्रकरणी रामलालची पत्नी ज्ञानवती यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यात हिट अँड रन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ७२ तासांनंतरही आरोपी हनीला अटक झालेली नाही.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
श्रीमंत कुटुंबातील एका मुलाने बीएमडब्ल्यू चालवत पायी जाणाऱ्या माणसाला जोरदार धडक दिली, त्यामध्ये रामलाल नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पण शवविच्छेदनानंतर कुटुंबीय मृतदेह घेऊन रस्त्यावरच बसले.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी कुटुंबीयांना खूप समजावून सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. बीएमडब्ल्यू चालवणाऱ्या तरुणाचं नाव हनी असून तो भाजप नेत्याचा मुलगा आहे. या घटनेनंतर दोघे पिता-पुत्र फरार होते. पण आता भाजपा नेत्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.