महाराष्ट्र पोलीस उद्धव ठाकरेंवर FIR दाखल करणार? योगींबद्दच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून भाजप नेत्याची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 08:40 PM2021-08-25T20:40:21+5:302021-08-25T20:41:46+5:30
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अटक प्रकरणानंतर आता भाजपही आक्रमक झाला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी बुधवारी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.
यवतमाळ- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीआदित्यनाथ यांच्या विरोधात मुंबईतील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी बुधवारी उमरखेड पोलीस ठाण्यात केली आहे. (BJP leader seeks FIR against uddhav over Uttar Pradesh cm should be beaten with chappals remarks)
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अटक प्रकरणानंतर आता भाजपही आक्रमक झाली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी बुधवारी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या विरोधात केलेले वक्तव्य दोन समाजात तेढ निर्माण करणारे असल्याचे सांगत, या चिथावणीखोर भाषणप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
फडणवीस म्हणाले होते, राणेंच्या वक्तव्याला समर्थन नाही, पण...; आता राणेंनीही स्पष्ट शब्दात दिलं उत्तर
२५ ऑक्टोबर २०२०रोजी मुंबई येथील मेळाव्यात ठाकरे यांनी आदित्यनाथ यांच्या विरोधात वक्तव्य केले होते. ‘योगी असेल तर तो मुख्यमंत्री कसा होऊ शकतो, त्याने कोठे तरी गुहेत जावून बसायला हवे, असे सांगत त्याला त्याच्याच चपला घेवून थोबाडीत मारावे’ असे ठाकरे या भाषणात म्हणाल्याचा दावा, भुतडा यांनी केला आहे. तसेच, या भडकावू भाषणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असून आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे सांगत या प्रकरणी चौकशी करून गुन्हा नोंदवावा, असे भुतडा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारीबाबत चौकशी करू - पोलीस अधीक्षक
या अर्जाबाबत पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना विचारले असता, उमरखेड पोलीस ठाण्यात नितीन भुतडा यांनी तक्रार अर्ज दिला आहे. ठाण्यातील संबंधित कर्मचाऱ्यांनी तक्रारीच्या अनुषंगाने पोचही दिली आहे. तक्रारदाराने अर्जात म्हटल्याप्रमाणे चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
'पवारसाहेब, ज्याला मुख्यमंत्री केलं त्याचा संसस्कृतपणा बघा, राणेंनी वाचनचं केलं'
यवतमाळमधील उमरखेड शिवाय महागाव, दिग्रस, पुसद येथील पोलीस ठाण्यातही भाजपाकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या असल्याचेही समजते.