खळबळजनक! दिवसाढवळ्या गोळ्या घालून भाजपा नेत्याची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 12:51 PM2020-06-03T12:51:28+5:302020-06-03T12:55:11+5:30
पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. यासह राहुल सिंह यांच्या कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांची चौकशी केली जात आहे.
दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला भरदिवसा ठार मारण्यात आले. पूर्व दिल्लीतील पश्चिम विनोद नगर येथीलभाजपा नेते राहुल सिंग उर्फ भुरु सिंग यांच्यावर 6 गोळ्या झाडून मारण्यात आले आहे. बुधवारी सकाळी राहुल सिंग यांच्यावर हल्ला झाला. जेव्हा ते मॉर्निंग वॉकवर बाहेर पडले होते.
मयूर पब्लिक स्कूलजवळ हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. 8 महिन्यांपूर्वीही राहुल सिंग यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. पण त्यातून ते बचावले होते. असे म्हणतात की, भाजप नेते राहुल सिंग यांची परस्पर वादातून खून करण्यात आले आहे.
पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. यासह राहुल सिंह यांच्या कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांची चौकशी केली जात आहे.
खळबळजनक! दिवसाढवळ्या भाजपा नेत्याची हत्या, ६ गोळ्या झाडल्या https://t.co/CbvSFUB0GJ
— Lokmat (@MiLOKMAT) June 3, 2020
नागपुरात भाजयुमोच्या शहर उपाध्यक्षची हत्या,दोघांना अटक