भाजपा नेत्या, TIKTOK स्टार सोनाली फोगाट यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 02:44 PM2020-06-17T14:44:29+5:302020-06-17T14:51:32+5:30
सोनाली फोगाट यांना हिसार मार्केट किमिटीचे सेक्रेटरी सुल्तानसिंह यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर जामिनावर मुक्तता करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हिसार - भाजपा नेत्या आणि टीकटॉक स्टार सोनाली फोगाट यांनी हिसार मार्केट किमिटीचे सेक्रेटरी सुल्तानसिंह यांना चारचौघात चप्पलेनं मारहाण केली होती. सोशल मीडियावर सोनाली यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. सोनाली यांनी चप्पलेसह त्यांना थप्पडही लगावली होती. असभ्य भाषेचा वापर केल्यामुळे फोगाट यांनी कमिटीच्या सेक्रेटरीवर हल्लाबोल केला. तेथील उपस्थितांनीच हा व्हिडिओ शूट करून व्हायरल केला होता. सोनाली फोगाट यांना हिसार मार्केट किमिटीचे सेक्रेटरी सुल्तानसिंह यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनीअटक केली. त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर जामिनावर मुक्तता करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हरियाणातील हिसार येथील मार्केट कमिटीमध्ये सोनाली फोगाट पोहोचल्या होत्या. त्यावेळी, काही कारणावरुन मार्केट कमिटीच्या सेक्रेटरीसोबत त्यांचा वाद झाला होता. नंतर हे भांडण वाढल्याने, सोनाली यांनी थेट सेक्रेटरी सुल्तानसिंह यांना कानशिलात लगावली होता. त्यानंतर, आपल्या पायातील चप्पल काढून त्यांना मारहाण केली. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला असून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या व्हिडिओत सोनाल यांचा आवाज ऐकायला येत आहे. 'आप किस तरह से ऐसी बात कर सकते है'... असं त्या व्हिडिओत म्हणत आहेत.
मार्केट कमिटीच्या सेक्रेटरीने त्यांच्याशी गैरवर्तन केले, असा आरोप सोनाली यांनी केला. त्यामुळे, संताप अनावर झाल्याने सोनाली यांनी चप्पलेने सेक्रेटरीला मारहाण केली. हरियाणातील गेल्या विधानसभा निवडणुकीत सोनाली फोगाट यांनी आदमपूर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री भजनलालचे सुपुत्र कुलदीप बिश्नोई यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. सोनाली फोगाट या टीकटॉक स्टार असून टीकटॉकवर त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
बाप की नरपिशाच्च? लॉकडाऊनमध्ये पोटच्या मुलीवर बलात्कार करून द्यायचा गर्भपाताचे औषध
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येवर देशभरात चर्चा, SCनंही मानसिक आजाराबाबत केला सवाल