महिलांवर वाईट नजर ठेवायचा भाजपा नेता; CRPF च्या निवृत्त जवानानं कायमचा संपवला, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 01:41 PM2023-06-03T13:41:43+5:302023-06-03T13:42:48+5:30

गोरखपूरच्या गोला पोलीस स्टेशन हद्दीतील मल्लीपूर शाहदौली गावात २३ मेच्या रात्री झालेल्या भाजपा नेते नित्यानंद राय यांच्या हत्येचा खुलासा पोलिसांनी केला आहे

BJP leader used to keep an evil eye on women; A retired CRPF jawan killed him | महिलांवर वाईट नजर ठेवायचा भाजपा नेता; CRPF च्या निवृत्त जवानानं कायमचा संपवला, मग...

महिलांवर वाईट नजर ठेवायचा भाजपा नेता; CRPF च्या निवृत्त जवानानं कायमचा संपवला, मग...

googlenewsNext

गोरखपूर - गोरखपूरच्या गोला भागात भाजपा नेते नित्यानंद राय यांच्या हत्येचं रहस्य उघड झाले आहे. CRPF मधून निवृत्त झालेल्या भाजपा नेत्याच्या मित्रानेच ही हत्या केली. आरोपीला नित्यानंद राय याच्या चारित्र्यावर संशय होता. त्यासाठी त्याने अनेकदा त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. तरीही नित्यानंद राय त्यांची करतूत कमी झाली नाही. नित्यानंद राय मारेकऱ्याच्या कुटुंबातील महिलांवर वाईट नजर ठेवत असल्याचा आरोप आहे. गोरखपूर पोलिसांनी आरोपी दिलीप सिंगला अटक करून तुरुंगात पाठवले.

गोरखपूरच्या गोला पोलीस स्टेशन हद्दीतील मल्लीपूर शाहदौली गावात २३ मेच्या रात्री झालेल्या भाजपा नेते नित्यानंद राय यांच्या हत्येचा खुलासा पोलिसांनी केला आहे. या खुलाशातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नित्यानंद यांचे सीआरपीएफचे निवृत्त मित्र दिलीप सिंग यांनी ही हत्या केली. दिलीप सिंग गावातच अकादमी चालवतात. नित्यानंद यांच्या निधनानंतर अंत्यसंस्काराशी संबंधित सर्व कामात दिलीपही राय कुटुंबासोबत उपस्थित होते. जेणेकरुन कोणाला किंचितही शंका येणार नाही.

महिलांवर वाईट नजर ठेवणं कारण बनले
भाजपा नेते नित्यानंद राय आणि सीआरपीएफचे निवृत्त जवान दिलीप सिंग यांची घट्ट मैत्री होती. दोघेही नेहमी सोबत राहत. दिलीप सिंह म्हणतात की, नित्यानंदचे चारित्र्य चांगले नव्हते. गावातील महिलांवर त्याची वाईट नजर असायची. नित्यानंदला अनेकवेळा समजवण्याचा प्रयत्न केला. पण तो मानायला तयार नव्हता. नित्यानंदने अकादमीच्या महिला कर्मचार्‍यांवर वाईट नजर ठेवण्यास सुरुवात केली, ज्यात माझ्या स्वतःच्या कुटुंबातील महिलाही होत्या. मला याबाबत सुगावा लागल्यावर मी त्याला धडा शिकवण्याचा विचार केला. मला त्याला मारायचे नव्हते, पण परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने गोळीबार केला आणि त्याचा मृत्यू झाला. एसएसपी गौरव ग्रोव्हर यांनी हत्येची उकल करणाऱ्या टीमला २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Web Title: BJP leader used to keep an evil eye on women; A retired CRPF jawan killed him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.