भाजपा मंत्र्यास दोनदा नडलेल्या IPS अधिकाऱ्याने ३ नोकऱ्यांवर सोडले पाणी, जाणूया कोण आहे संगिता कालिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 03:38 PM2021-03-29T15:38:21+5:302021-03-29T15:39:14+5:30

IPS Sangita Kalia : संगीताने भिवानीतून शिक्षण घेतले आणि 2005 मध्ये प्रथमच यूपीएससीची परीक्षा दिली. २००९ मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या.

BJP minister who was twice disputed by IPS officer, she quit 3 jobs, let's find out who is Sangita Kalia | भाजपा मंत्र्यास दोनदा नडलेल्या IPS अधिकाऱ्याने ३ नोकऱ्यांवर सोडले पाणी, जाणूया कोण आहे संगिता कालिया

भाजपा मंत्र्यास दोनदा नडलेल्या IPS अधिकाऱ्याने ३ नोकऱ्यांवर सोडले पाणी, जाणूया कोण आहे संगिता कालिया

googlenewsNext
ठळक मुद्देआयपीएस संगीता कालिया यांचे वडील धर्मपाल हे फतेहाबाद पोलिसात कार्यरत होते आणि 2010 मध्ये तेथून निवृत्त झाले.

चंदीगड हरियाणाच्या महिला आयपीएस संगीता कालियाची कहाणी खूप रंजक आहे. तिचे वडील पोलीस विभागात कार्पेन्टर होते. संगीता कालिया यांनी सहा नोकर्‍या सोडल्या आणि आयपीएस झाल्या. पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळताना भाजपाच्या मंत्र्याला दोनदा भिडली आणि त्यांना शिक्षा दिली. संगीता कालिया यांचा जन्म भिवानी जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबात झाला. काहीतरी वेगळे करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण केले.

फार थोड्या लोकांना माहिती असेल की, एसपी (पोलीस अधीक्षक) म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग पोलिस विभागात झाली होती. आयपीएस संगीता कालिया यांचे वडील धर्मपाल हे फतेहाबाद पोलिसात कार्यरत होते आणि 2010 मध्ये तेथून निवृत्त झाले. संगीताने भिवानीतून शिक्षण घेतले आणि 2005 मध्ये प्रथमच यूपीएससीची परीक्षा दिली. २००९ मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या.
 

ही मालिका पाहून संगीताला मिळाली प्रेरणा 

संगीता कालिया यांच्या म्हणण्यानुसार, तिला उडान मालिका पाहून पोलिसात येण्याची प्रेरणा मिळाली. तिचे पती विवेक कालिया हे देखील हरियाणामध्ये एचसीएस आहेत. संगीता कालिया अशी एक व्यक्ती आहे. तिने सहा नोकऱ्यांची ऑफर सोडून पोलिस विभागात आली.


अनिल विज यांचा वाद झाला

संगीता कालिया यांचा आरोग्य मंत्री अनिल विज यांच्याशी सन 2018 मध्ये वाद झाला होता. तरीही ती चर्चेत राहिली. अनिल विज फतेहाबादमध्ये समस्या निवारण समितीची बैठक घेत होते. ड्रग्स विक्री संबंधित तक्रारीवर विज यांनी संगीता कालिया यांच्याकडे जाब विचारला. तेव्हा संगीता कालिया यांनी उत्तर दिले की, आमच्याकडून दारू तस्करांवर वर्षात अडीच हजार गुन्हे नोंदवले गेले आहेत. पोलिस कोणालाही गोळी मारू शकत नाहीत. या प्रकरणावर विज आणि संगीता कालिया यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर ही बैठक दरम्यान थांबवावी लागली.

दोनदा विज यांच्याशी घेतला पंगा 

पुन्हा एकदा तीच घटना घडली. मंत्री विज यांच्याशी सामना केल्यानंतर संगीता कालिया यांची रेवाडी येथून बदली झाल्यानंतर पानिपत येथे पोस्टिंग झाली आणि आता पुन्हा ती पानिपत येथे मंत्री अनिल विज यांच्याशी पुन्हा तिचा सामना झाला. एवढेच नव्हे तर पुन्हा मंत्र्यांच्या रागाची ती शिकार बनली. विज यांनी एसपी संगीता यांची मुख्यमंत्री खट्टर यांच्याकडे तक्रार केली. एसपी कालिया यांची पुन्हा एकदा सव्वा दोन महिन्यांत बदली झाली.

आता एसपी रेल्वेमध्ये आहे

आयपीएस संगीता कालिया मूळची भिवानी जिल्ह्यातील आहे. फतेहाबादनंतर त्यांची बदली रेवाडी येथे झाली. त्यानंतर ती भिवानी आणि पानिपत काही काळ राहिली. त्या आता रेल्वेमध्ये एसपी म्हणून कार्यरत आहे.

Web Title: BJP minister who was twice disputed by IPS officer, she quit 3 jobs, let's find out who is Sangita Kalia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.