भाजप आमदार राजा सिंह पोलिसांच्या ताब्यात, 'ते' वादग्रस्त वक्तव्य भोवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 10:35 AM2022-08-23T10:35:53+5:302022-08-23T10:36:47+5:30
मिळालेल्या माहितीनुसार राजा सिंह यांच्याविरोधात अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत
हैदराबाद - भाजप नेत्या नुपूर शर्मा यांच्यानंतर आता तेलंगाणामधील भाजपाआमदार टी राजा सिंह यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यानंतर, हैदराबादेत त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली असून मुस्लीम नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. राजा सिंह यांच्या अटकेची मागणी या लोकांकडून करण्यात येत होती. त्यामुळे, अखेर तेंलगणातील हैदराबाद पोलिसांनी राजा सिंह यांना ताब्यात घेतलं. त्यांना गाडीत घालून पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार राजा सिंह यांच्याविरोधात अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत. एवढंच नाही तर दबीरपुरा, भवानीनगर, रेनबाजार, मिरचौक पोलीस ठाण्यांमध्ये राजा सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तसेच संसप्त लोकांनी राजा सिंह यांच्याविरोधात आंदोलनही केले.
Telangana Police detains BJP MLA Raja Singh for his alleged derogatory comments against Prophet Muhammad https://t.co/wZrwhIX1D1pic.twitter.com/e4kkvM10ZQ
— ANI (@ANI) August 23, 2022
आमदार राजा सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांनी सांगितले की, राजासिंह एका समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आमदाराविरुद्ध तीव्र आक्रोश व्यक्त केला जात आहे. तसेच त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली जात आहे. सोमवारी रात्री पोलीस कमिश्नन सी.व्ही. आनंद यांचे कार्यालय आणि शहराच्या इतर भागांमध्ये आंदोलन सुरू झाले. या व्हिडीओमध्ये राजा सिंह हे कॉमेडियन मुनव्वर फारुखी आणि त्याच्या आईबाबतही टिप्पणी करताना दिसत आहेत. त्यामुळे संतप्त लोकांनी आंदोलन करत त्यांच्या अटकेची मागणी केली.
दरम्यान, टी. राजा सिंह हे हैदराबादमधील गोशामहल मतदारसंघातील आमदार आहेत. यापूर्वी त्यांनी कॉमेडियन मुनव्वर फारुकी यांनाही धमकी दिली होती. सिंह यांनी हल्लीच एक व्हिडीओ अपलोड केला होता. त्यामध्ये त्यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त विधान केले होते.