Ravi Kishan : अभिनेते, भाजपा खासदार रवी किशन यांची 3.25 कोटींची फसवणूक; 34 लाखांचा चेक बाऊन्स अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 03:25 PM2022-09-28T15:25:12+5:302022-09-28T15:29:42+5:30

Ravi Kishan : रवी किशन यांची तब्बल 3.5 कोटींची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी गोरखपूरच्या कँट पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली आहे.

bjp mp ravi kishan duped more than 3 crore filed complain | Ravi Kishan : अभिनेते, भाजपा खासदार रवी किशन यांची 3.25 कोटींची फसवणूक; 34 लाखांचा चेक बाऊन्स अन्...

Ravi Kishan : अभिनेते, भाजपा खासदार रवी किशन यांची 3.25 कोटींची फसवणूक; 34 लाखांचा चेक बाऊन्स अन्...

Next

प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते आणि गोरखपूरचे भाजपाचे खासदार रवी किशन (Ravi Kishan) यांची मोठी फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. रवी किशन यांची तब्बल 3.5 कोटींची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी गोरखपूरच्या कँट पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली आहे. एका बिल्डरने त्यांची सव्वा तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी या तक्रारीत करण्यात आला आहे. रवी किशन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

पोलिसांत दाखल केलेल्या रिपोर्टनुसार, रवी किशन यांनी 2012 मध्ये मुंबईतील रहिवासी जैन जितेंद्र रमेश नावाच्या व्यक्तीला 3.25 कोटी रुपये दिले होते आणि जेव्हा त्यांनी त्याला पैसे परत करण्यास सांगितले तेव्हा त्याने त्यांना 34 लाखांचे 12 चेक दिले. रवी किशन यांनी 7 डिसेंबर 2021 रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँक रोड गोरखपूर शाखेत 34 लाखांचा एक चेक जमा केला तेव्हा चेक बाऊन्स झाला. 

सतत पैशांची मागणी करूनही व्यापारी पैसे परत करण्यास तयार होत नसल्याने खासदाराने पोलिसांत तक्रार केली आहे. कँट पोलीस स्टेशनचे अधिकारी शशी भूषण राय यांनी दिलेल्या माहितीनुसरा, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पूर्वी खासदार कँट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंघारिया येथे राहत होते, परंतु अलीकडे ते तारांगण लेक व्ह्यू कॉलनी येथील घरात राहू लागले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

आपल्या राजकीय स्टेटमेंटमुळे तर कधी अभियनाच्या फिल्मी दुनियेमुळे रवी किशन कायम चर्चेत असतात. सोशल मीडियावरही ते जास्त सक्रिय पाहायला मिळाले. मात्र गेल्या काही दिवसांपासून रवी किशन अनेक समस्यांचा सामना करत आहेत. काही महिन्यांपूर्वी आपल्या भावाला गमावल्यानंतर आता त्यांना आईच्या प्रकृतीची चिंता आहे. आईला कॅन्सर झाल्याचे समजताच त्यांना मोठा धक्का बसला. मात्र या धक्क्यातून सावरत त्यांनी आईच्या उपचारासाठी मेहनत घेतली. त्यामुळेच, त्यांच्या आईने कॅन्सवर मात केली. 
 

Web Title: bjp mp ravi kishan duped more than 3 crore filed complain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.