भाजप खासदाराच्या कंपनीच्या खात्यातून सायबर ठगांनी उडवले १० लाख, त्यांचाच फोटो ठरला कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 10:10 AM2022-05-12T10:10:26+5:302022-05-12T10:12:00+5:30

Cyber Crime : सायबर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

bjp mp surya company owner raju bista 10 lakh cyber fraud whatsapp call fir | भाजप खासदाराच्या कंपनीच्या खात्यातून सायबर ठगांनी उडवले १० लाख, त्यांचाच फोटो ठरला कारण

भाजप खासदाराच्या कंपनीच्या खात्यातून सायबर ठगांनी उडवले १० लाख, त्यांचाच फोटो ठरला कारण

googlenewsNext

Cyber Crime : सायबर गुन्हेगारांनी भाजपचे खासदार राजू बिस्ता यांच्या कंपनीच्या खात्यातून तब्बल १० लाख रुपये उडवले. सायबर गुन्हेगारांनी कंपनीच्या अधिकाऱ्याला खासदार म्हणून फोनवर संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी जेव्हा पैसे पाठवण्यास सांगितले तेव्हा याचा खुलासा झाला. या प्रकरणी आता जिल्हा सायबर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दार्जिलिंगचे खासदार राजू बिस्ता हे सूर्या रोशनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालकही आहेत. कंपनीचं कार्यालय राजेंद्र प्लेस येथे आहे. कंपनीचे अकाऊंटंट विजय गोपाल गुप्ता यांनी २४ मार्च रोजी सायबर पोलीस स्थानकात यासंदर्भातील तक्रार दिली. तक्रारीनुसार २३ मार्च रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास गुप्ता यांच्या व्हॉट्सअॅपवर एक कॉल आला, परंतु फोन उचलण्यापूर्वीच तो कट झाला.

त्यानंतर गुप्ता यांना त्या मोबाईल क्रमांकावर राजू बिस्ता यांचा फोटो दिसला. यासोबतच चार पाच मेसेजेसही आले होते. हा माझा वैयक्तिक फोन क्रमांक आहे आणि मी एका बैठकीत असल्यानं मला फोन करू नका. तसंच त्वरित १० लाख रुपयांचं आरटीजीएस करण्यात यावं असंही त्या मेसेजेसमध्ये लिहिण्यात आलं होतं. त्या नंबरवर बिस्ता यांचा फोटो असल्यानं गुप्ता यांनी त्वरित पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू केली. तसंच त्यांनी बँकेचे मॅनेजर विनोद गोयल यांनाही फोन करून लवकरात लवकर हे काम करण्यास सांगितलं. यानंतर त्यांनीही पैसे लगेच ट्रान्सफर केले. दरम्यान, बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजरलाही खासदारांचा पीए म्हणून फोन आल्याची माहिती समोर आली आहे. 

या प्रकरणी आता एफआयआर दाखल करण्यात आले आहे. राजू बिस्ता हे रोशनी लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकही आहेत. ते दार्जिलिंग येथून खासदार असून ते भाजपते राष्ट्रीय प्रवक्ता देखील आहेत.

Web Title: bjp mp surya company owner raju bista 10 lakh cyber fraud whatsapp call fir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.