भाजपा खासदाराच्या मुलाने पक्षाच्या कार्यकर्त्याला घरात घुसून मारलं; पोलिसांकडून गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 12:58 PM2020-05-24T12:58:21+5:302020-05-24T13:00:18+5:30
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, कोटला कॉलनी वार्डातून मनपा निवडणूक लढविण्यासाठी कुणाल मराठे आणि खा. कराड यांचे पुत्र भाजपाकडून इच्छुक उमेदवार आहेत
औरंगाबाद : कोटला कॉलनीतील रहिवासी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुणाल मराठे यांना भाजपा खासदार डॉ भागवत कराड यांच्या पुत्रानी घरात घूसुन मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजता घडली. याविषयी क्रांतीचौक ठाण्यात तीन जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. हर्षवर्धन कराड, वरुण कराड आणि पवन सोनवणे अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपीची नावे आहेत.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, कोटला कॉलनी वार्डातून मनपा निवडणूक लढविण्यासाठी कुणाल मराठे आणि खा. कराड यांचे पुत्र भाजपाकडून इच्छुक उमेदवार आहेत. यातून कुणाल आणि हर्षवर्धन कराड यांच्यात धुसफूस सुरू आहे. या वादातून शनिवारी रात्री कुणाल यांना घरात घुसून मारहाण करण्यात आली. घटनेनंतर कुणालने क्रांती चौक ठाण्यात तक्रार नोंदविली. या तक्रारीत कुणाल यांनी नमूद केले की, रात्री दहा वाजता कोटला कॉलनीतील त्यांच्या घरात घुसून हर्षवर्धन कराड, वरुण कराड आणि पवन सोनवणे या तिघांनी शिवीगाळ करून हल्ला केला. वार्डात फिरायचे नाही, मनपा निवडणूकमध्ये पक्षाकडून मला उमेदवारी मिळणार आहे. तू लोकाना मदत करायची नाही असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण केली. यावेळी नातेवाईकानी आरडाओरड केल्यानंतर हर्षवर्धन, वरुण आणि पवन तेथून निघून गेले.
या घटनेनतर कुणाल यांनी क्रांती चौक ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात उपचार करण्यासाठी रुग्णालयात पाठवले. उपचार करून परतल्यानंतर पोलिसांनी कुणाल यांची फिर्याद नोंदवून घेतली. मारहाण करणाऱ्यांपासून कुटुंबाला धोका असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
याबाबत खासदार भागवत कराड यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. या हल्ल्याशी माझ्या मुलाचा कोणताही संबंध नाही, पवन सोनावणे आणि कुणाल मराठे यांच्यातील हा वाद आहे. त्यांच्यात गैरसमज झाला आहे. यादरम्यान तिघांनी मिळून कुणाल याला समजवण्याचा प्रयत्न केला असता चर्चेतून वाद वाढला. त्यावेळी पवन सोनावणे याने कुणाल मराठेला मारहाण सुरु केली. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक! भाड्याचे पैसे देण्याऐवजी घरमालकांकडून महिलांकडे लैंगिक सुखाची मागणी
कोल्लममधील महिलेचा मृत्यू सर्पदंशाने की हत्या?; पोलिसांनी पतीसह २ जणांना घेतलं ताब्यात
माकडांवरील कोरोना लस चाचणीमुळे अपेक्षा वाढल्या; प्रयोगानंतर शरीरात झाला चमत्कार!
भाऊ, नावातचं सगळं आहे! चक्क कोरोना रुग्णाला दिला डिस्चार्ज; रुग्णालय प्रशासनाची पळापळ
जाणून घ्या! कोरोना व्हायरस कधीपर्यंत नष्ट होणार?; ज्योतिषांची ‘भविष्यवाणी’