खळबळजनक! भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर 6 जणांचा सामूहिक बलात्कार; आरोपींपैकी 2 जण TMC चे कार्यकर्ते
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 10:34 AM2021-08-10T10:34:25+5:302021-08-10T10:39:15+5:30
BJP worker wife brutally gangraped by tmc workers : भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर सहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींपैकी दोन तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत.
नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) एक भयंकर घटना समोर आली आहे. भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर सहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींपैकी दोन जण तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. ही महिला स्थानिक भाजपा कार्यकर्त्याची पत्नी असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 34 वर्षीय महिलेवर तिच्याच घरात सहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून राजकारण तापलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आपल्या घरी एकटी असताना आरोपी घरात शिरले आणि महिलेचे हात, पाय बांधून तिच्यावर बलात्कार केला. महिला आजारी असल्यामुळे महिलेला बोलताना त्रास होत असल्या कारणाने ती मदतीसाठी आवाज देऊ शकली नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे. यावेळी महिलेचा पती कामानिमित्त घराबाहेर होता. सहा आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. शेख सय्यद आणि जोयनाल मुल्लिक अशी त्यांनी नावं आहेत. दरम्यान आरोपींमध्ये तृणमूलचे ब्लॉक अध्यक्ष कुतुबुद्दीन आणि स्थानिक कार्यकर्त्याचा समावेश आहेत.
34 year old wife of a BJP worker tied and brutally gangraped by TMC workers led by Kutubuddin Mallik and others in Bengal’s Bagnan.
— Amit Malviya (@amitmalviya) August 9, 2021
Local police initially refused to even file her complaint and wanted to dilute the case.
TMC is using rape as a political tool to silence opponents. pic.twitter.com/pcr471ygyt
"TMC विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी बलात्काराचा राजकीय साधन म्हणून वापर करतंय"
महिलेला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाजपाचे आयटी सेल प्रमुख अमित मालविया यांनी याप्रकरणी गंभीर आरोप केला आहे. "पोलिसांनी सुरुवातीला महिलेची तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला. प्रकरण दडपण्याचा त्यांचा प्रयत्न होता. टीएमसी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी बलात्काराचा राजकीय साधन म्हणून वापर करत आहे" असं म्हटलं आहे. तसेच टीएमसी सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी बलात्कारासारख्या गुन्ह्यांना पाठबळ देत असल्याचा आरोप देखील भाजपाने केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
खळबळजनक! हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेचा छळ; कुटुंबातील 12 जणांकडून सामूहिक बलात्कार#crime#crimesnews#Policehttps://t.co/ebkbOMSRuT
— Lokmat (@MiLOKMAT) August 9, 2021
संतापजनक! हुंड्यामध्ये कार आणि 5 लाख न दिल्याने सासरचे झाले हैवान; विवाहितेवर 12 जणांकडून बलात्कार
देशामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. हुंड्यामध्ये एसयूव्ही कार आणि 5 लाख रुपये दिले नाहीत म्हणून सासरची मंडळी हैवान झाली. विवाहितेवर कुटुंबातील 12 जणांकडून बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमध्ये ही भयंकर घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका तरुणीने हुंडा दिला नाही म्हणून कुटुंबातील 12 जणांविरोधात सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. यासंदर्भात महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
माणुसकीला काळीमा! बहिणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून भावाने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला पण झालं असं काही...#crime#Police#crimesnewshttps://t.co/qvKpHsfEc5
— Lokmat (@MiLOKMAT) August 9, 2021
धक्कादायक! भाजपा नेत्याच्या हत्येने परिसरात खळबळ#Crime#BJP#Policehttps://t.co/JRNPWqgO2r
— Lokmat (@MiLOKMAT) August 9, 2021