काळवीट प्रकरणः खोट्या प्रतिज्ञापत्राप्रकरणी सलमानला जोधपूर कोर्टाचा दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 03:51 PM2019-06-17T15:51:59+5:302019-06-17T15:54:35+5:30

खोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्याच्या प्रकरणातही सलमान खानला निर्दोष ठरवण्यात आलं आहे. 

blackbuck case: Salman Khan gets relief from Jodhpur court in false affidavit case | काळवीट प्रकरणः खोट्या प्रतिज्ञापत्राप्रकरणी सलमानला जोधपूर कोर्टाचा दिलासा 

काळवीट प्रकरणः खोट्या प्रतिज्ञापत्राप्रकरणी सलमानला जोधपूर कोर्टाचा दिलासा 

googlenewsNext
ठळक मुद्दे२००६ मध्ये सलमान खानने खोटं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलं होतं. १९९८ साली सलमान खान हा हम साथ साथ है या चित्रपटाच्या शूटिंगसाठी जोधपूरला गेला होता. सलमानचा शस्त्र परवाना हरवला नसून तो नुतनीकरणासाठी दिल्याची माहिती उघडकीस आली होती.

नवी दिल्ली - जोधपूर कोर्टाने अभिनेता सलमान खानला खोट्या प्रतिज्ञापत्र प्रकरणात दिलासा दिला आहे. काळवीट शिकार प्रकरणात खोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्याच्या प्रकरणातही सलमान खानला निर्दोष ठरवण्यात आलं आहे. 
२००६ मध्ये सलमान खानने खोटं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलं होतं. ज्यामध्ये सलमानने त्याचा शस्त्र बाळगण्याचा परवाना हरवल्याचं नमूद केलं होतं. मात्र, आता या प्रकरणात देखील सलमान खानला कोर्टाने दिलासा दिला आहे. खोटं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करण्याचा सलमानचा हेतू नव्हता असा दावाही त्याच्या वकिलांनी केला आहे. 
१९९८ साली सलमान खान हा हम साथ साथ है या चित्रपटाच्या शूटिंगसाठी जोधपूरला गेला होता. त्यावेळी काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानवर तीन आणि आर्म्स अ‍ॅक्ट (बेकायदा शस्त्र बाळगणे) प्रकरणात एक गुन्हा दाखल होता. आर्म्स  अ‍ॅक्ट प्रकरणात सलमान खानला याअगोदर दिलासा मिळाला आहे. आता आणखी एका प्रकरणात त्याला दिलासा देण्यात आला आहे. या सगळ्या खटल्याच्या दरम्यान सलमान खानला त्याचा शस्त्र परवाना कोर्टात जमा करायचा होता. पण, सलमानने हा परवाना हरवल्याचे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले होते. सलमानचा शस्त्र परवाना हरवला नसून तो नुतनीकरणासाठी दिल्याची माहिती उघडकीस आली होती. त्यामुळे सलमान खानने खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात कारवाई केली जावी अशी मागणी २००६ साली करण्यात आली होती. 




 

Web Title: blackbuck case: Salman Khan gets relief from Jodhpur court in false affidavit case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.