काश्मीर युनिव्हर्सिटीबाहेर स्फोट; दोनजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 03:53 PM2019-11-26T15:53:45+5:302019-11-26T15:54:34+5:30
अद्याप स्पष्ट झालेले नाही की हा ग्रेनेड स्फोट आहे की पेट्रोल स्फोट आहे.
जम्मू - काश्मीर - श्रीनगर येथील काश्मीर युनिव्हर्सिटीबाहेर आज स्फोट झाला असून या स्फोटात दोनजण जखमी झाले आहेत. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार हा ग्रेनेड स्फोट आहे. मात्र, तपास यंत्रणांना हे अद्याप स्पष्ट झालेले नाही की हा ग्रेनेड स्फोट आहे की पेट्रोल स्फोट आहे.
याआधी देखील ४ नोव्हेंबरला काश्मीरमध्ये मौलाना आझाद रोडवरील लाल चौक येथील बाजारपेठेत ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एकाच मृत्यू तर २२ जण जखमी झाले होते. तसेच २८ ऑक्टोबरला बारामुल्ला जिल्ह्यातील इक्बाल मार्केटमध्ये ग्रेनेड हल्ल्यात १९ जण जखमी झाले होते.
Jammu and Kashmir: 2 people injured in a grenade blast near Kashmir University gate in Srinagar. More details awaited. https://t.co/cdyIp0kA1dpic.twitter.com/ZrJ8bX75Uk
— ANI (@ANI) November 26, 2019
Jammu and Kashmir: 2 people injured in a grenade blast near Kashmir University gate in Srinagar. More details awaited. pic.twitter.com/pta3tPqsXF
— ANI (@ANI) November 26, 2019
काश्मीर विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी हल्ला करण्यात आला. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. सैन्य आणि पोलिसांनी लगेचच शोध सुरू केला. यावेळी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला आहे. सोमवारी सायंकाळी एका दहशतवाद्यांना मारल्यानंतर सुरक्षादलांनी शोधमोहिम राबविली होती.
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावे इरफान नैरा आणि इरफान राथर अशी आहेत. नैरा यांनी 2016 आणि राथर 2017 पासून सक्रीय होता. दोन्ही दहशतवाद्यांनी याआधी भारतीय सैन्यदलांवर अनेकदा हल्ले केले आहेत. पोलिसांनी सांगितले की, सर्व परिसरामध्ये स्फोटके पेरली गेल्याची शक्यता आहे. नागरिकांनी चकमकीच्या ठिकाणी जाऊ नये, धोक्याचे ठरू शकते असा इशारा लष्कराने दिला आहे. तसेच पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
370 कलम रद्द केल्यानंतर गेल्याच महिन्यात 144 कलम हटविण्यात आले आहेत. यामुळे शाळा, कॉलेज, बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. याचा फायदा दहशतवादी घेण्य़ाच्या तयारीत आहेत. या कारवायांशी दोन हात करण्यासाठी भारतीय सैन्यदलाने पॅरा, नौदल, हवाई दलाच्या अनेक तुकड्या काश्मीरमध्ये तैनात केल्या आहेत. यामध्ये हवाईदलाची गरुड फोर्सही आहे.