नवरात्रीदरम्यान घडवून आणणार होते स्फोट; दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 04:05 PM2021-09-16T16:05:51+5:302021-09-16T16:59:04+5:30
Delhi Police special Cell busted terror module : पाकिस्तानी दहशतवादी ISI मॉड्यूल उधळून लावल्यात केंद्रीय यंत्रणांसह दिल्ली पोलिसांना यश आले आहे.
दिल्ली आणि मुंबईसह आणखी काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांचा कट दिल्लीपोलिसांनी नुकताच उधळून लावला. दिल्ली पोलिसांनी मंगळवारी ६ दहशतवाद्यांना अटक केली. अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांपैकी एक मुंबईच्या सायन परिसरातील धारावीचा रहिवासी आहे. जान मोहम्मद अली मोहम्मद शेख असं या धारावीतील संशयित दहशतवाद्याचं नाव आहे. या सर्वांची दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून कसून तपास सुरू आहे आणि यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी दहशतवादी ISI मॉड्यूल उधळून लावल्यात केंद्रीय यंत्रणांसह दिल्ली पोलिसांना यश आले आहे. अटक दहशतवाद्यांच्या चौकशीत त्यांचा नवरात्रीदरम्यान स्फोट घडवून आणण्याचा कट होता असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलlच्या सूत्रांच्या माहितीनुसार या दहशतवाद्यांना रेल्वे लाईन आणि ब्रिज उडवण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं होतं. याचसह गर्दीची ठिकाणंही त्यांच्या टार्गेटवर होती. सूत्रांच्या माहितीनुसार हे दहशतवादी पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी गेले होते, परंतु त्यांच्या पासपोर्टवर तसा कोणताच स्टॅम्प नाही. त्यांनी समुद्री मार्गाचा पर्याय निवडला होता. ओमानहून पाकिस्तानाता जातावेळी त्यांनी मध्येच बोटही बदलली होती. दिल्लीत गृहमंत्रालयात उद्या याच अटक केलेल्या दहशतवाद्यांविषयी बैठक घेण्यात येणार आहे. त्यावेळेची आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेश ही राज्य या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होती. गर्दीच्या ठिकाणी तेलाच्या टँकरचा स्फोट घडवून आणण्याचा मनसुबा या दहशतवाद्यांचा होता.
पाकिस्तानमध्ये डी कंपनीशी जानचे २० वर्षापूर्वीचे संबंध; पायधुनी पोलीस ठाण्यात गोळीबाराची केसhttps://t.co/uOJcujW2sw
— Lokmat (@MiLOKMAT) September 15, 2021
धारावीत खळबळ, एक चरसी बनला दहशतवादी, सुरक्षेसाठी जानचे कुटुंब पोलिसांच्या देखरेखीखालीhttps://t.co/WOYG5neYmS
— Lokmat (@MiLOKMAT) September 15, 2021