डीआरआयच्या कारवाईत ७.४१ कोटींचे रक्तचंदन जप्त, एका संशयिताला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 01:16 AM2020-09-19T01:16:23+5:302020-09-19T01:17:04+5:30

ग्लोबिकॉन लॉजिस्टिक्सच्या गोदामात एका कार्गो कंटेनरमध्ये हॅण्डीक्रॉफ्ट स्टील मेटलच्या नावाखाली १८.५० मेट्रिक टन वजनाचा रक्तचंदनाचा साठा लपवून ठेवला होता.

Blood sandalwood worth Rs 7.41 crore seized in DRI operation, one suspect arrested | डीआरआयच्या कारवाईत ७.४१ कोटींचे रक्तचंदन जप्त, एका संशयिताला अटक

डीआरआयच्या कारवाईत ७.४१ कोटींचे रक्तचंदन जप्त, एका संशयिताला अटक

Next

उरण : उरण येथील ग्लोबिकॉन लॉजिस्टिक्सच्या गोदामातून तस्करीच्या मार्गाने दुबईत पाठविण्याच्या तयारीत असलेला रक्तचंदनाचा साडेअठरा मेट्रिक टनाचा साठा सोमवारी जप्त करण्यात आला आहे. मुंबई डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या या रक्तचंदनाच्या साठ्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ७ कोटी ४१ लाखांच्या घरात आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशातून एका संशयिताला अटक केल्याची माहिती डीआरआय अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री दिली.
ग्लोबिकॉन लॉजिस्टिक्सच्या गोदामात एका कार्गो कंटेनरमध्ये हॅण्डीक्रॉफ्ट स्टील मेटलच्या नावाखाली १८.५० मेट्रिक टन वजनाचा रक्तचंदनाचा साठा लपवून ठेवला होता. बनावट कागदपत्रांच्या आधारे हा रक्तचंदनाचा साठा यूएई येथील जेबल अली पोर्टमध्ये पाठविण्यात येणार होता. मात्र, मुंबई डीआरआय विभागाच्या अधिकाºयांना रक्तचंदनाच्या तस्करीची खबºयांकडून कुणकुण लागली होती. खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर चार दिवसांपूर्वी मुंबईच्या डीआरआय अधिकाºयांनी छापा टाकून संशयित कंटेनर ताब्यात घेऊन तपासणी करण्यास सुरुवात केली होती. या प्रकरणी उत्तर प्रदेशातून एका संशयिताला बुधवारी अटक केली आहे. तपासाअंती या तस्करीशी संबंधित आणखी संशयितांचा डीआरआयकडून शोध घेतला जात आहे.

Web Title: Blood sandalwood worth Rs 7.41 crore seized in DRI operation, one suspect arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.