रक्ताने माखलेला मृतदेह जंगलात सापडला, लाकूड तोडण्यासाठी गेलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 06:59 PM2022-02-03T18:59:46+5:302022-02-03T19:02:13+5:30

Murder Case : पोलिसांच्या प्राथमिक तपासात युवकाचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

Blood-stained body found in forest, brutal murder of youth | रक्ताने माखलेला मृतदेह जंगलात सापडला, लाकूड तोडण्यासाठी गेलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

रक्ताने माखलेला मृतदेह जंगलात सापडला, लाकूड तोडण्यासाठी गेलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

Next

केकरी : अलवरच्या केकरीजवळील मेवदा कलामध्ये एका तरुणाची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मेवदा कलातील जंगलात मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. मया पोलीस यांना माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम शर्मा, पोलीस उपअधीक्षक खिव सिंग ठाण्याचे प्रभारी सुधीर उपाध्याय यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात युवकाचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी अजमेरहून एफएसएल टीमला पाठवण्यात आले आहे. शवविच्छेदन आणि पोलिसांच्या प्राथमिक तपासात देखील कुऱ्हाडीने वार केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पतीने केला पत्नीचा सौदा अन् जयपूरमध्ये विकले; प्रेमविवाहाला झाले होते अवघे ९ महिने

मृताच्या मृतदेहाजवळ रक्ताने माखलेली कुऱ्हाड, मोबाईलसह काही अंतरावर देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या पोलिसांना सापडल्या आहेत. पोलिसांनी केकरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.

याबाबत मृताचा भाऊ धनराज गुर्जर याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, बुधवारी सकाळी ९.३० वाजता लहान भाऊ मुकेशसह विलायती बाभळीचे लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेले होते. पण संध्याकाळपर्यंत देवराज घरी आला नाही. यावर मुकेश यांनी त्यांना मोबाईलवर फोन केला मात्र उत्तर मिळाले नाही.

त्याचवेळी सायंकाळी उशिरा सुरजपुरा, जनकपुरी येथील रहिवासी रामप्रसाद गुर्जर यांच्यासह मुकेश यांनी देवराजचा शोध सुरू केला आणि ते जंगलात पोहोचले, तेथे देवराजचा रक्ताने माखलेला मृतदेह दिसला.  मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून केकरी शहर पोलिस स्टेशनचे सर्कल इन्स्पेक्टर सुधीर उपाध्याय यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Blood-stained body found in forest, brutal murder of youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.