पालिकेच्या लाचखोर मुकादमाला एसीबीने केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 07:14 PM2019-04-15T19:14:09+5:302019-04-15T19:14:45+5:30
आज एसीबीने ही कारवाई केली आहे.
मुंबई - बृहन्मुंबई महापालिकेच्या गोवंडी येथील एम पूर्व प्रभागातील मुकादम विनोद जाधव (३९) याला १० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) अटक केली आहे. आज एसीबीने ही कारवाई केली आहे.
फिर्यादी यांच्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरु होते असून २७ मार्च रोजी पालिकेचा मुकादम विनोद जाधवने त्यांच्या घरी भेट देऊन तुला माहित नाही का? तुला बांधकाम करायचे असेल तर पैसे द्यावे लागतील नाहीतर कारवाई कारेन असे सांगून फोन करून भेटायला सांगितले. त्यानंतर ११ एप्रिलला फिर्यादी यांनी मुकादमी जाधवला फोन केला असता प्रत्यक्ष भेटून पैशाचे काय ते ठरवू असे सांगितले. मात्र, फिर्यादी याची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे याबाबत तक्रार केली होती. जाधव याने फिर्यादीकडे १५ हजार इतकी रक्कम लाच म्हणून मागितली होती. त्यांनतर तडजोडीअंती १० हजार लाचेची रक्कम ठरविण्यात आली होती. त्यानंतर एसीबीने सापळा रचून विनोद जाधव यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.
मुंबई - बृहन्मुंबई महापालिकेचा मुकादम विनोद जाधव (३९) याला १० हजारांची लाच घेताना एसीबीने केली अटक https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) April 15, 2019