अपहृत मुलीचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 01:06 AM2018-09-28T01:06:14+5:302018-09-28T01:06:29+5:30
पिंपरीतील रमाबाईनगर परिसरातून सोमवारी अपहरण झालेल्या सात वर्षाच्या मुलीचा मृतदेह गुरुवारी पिंपरीतील एच़ ए़ मैदानावर सापडला. या मुलीवर अपहरणकर्त्याने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला जात आहे.
पिंपरी - पिंपरीतील रमाबाईनगर परिसरातून सोमवारी अपहरण झालेल्या सात वर्षाच्या मुलीचा मृतदेह गुरुवारी पिंपरीतील एच़ ए़ मैदानावर सापडला. या मुलीवर अपहरणकर्त्याने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला जात आहे.
धनश्री गोपाळ पुणेकर (वय ७, रा. रमाबाईनगर, पिंपरी) असे मृत मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धनश्रीची आई अर्चना आणि वडील गोपाळ दोघे जण सोमवारी सायंकाळी भाजी आणण्यासाठी भाजी मंडईमध्ये गेले. दरम्यान धनश्री घरातून गायब झाली. रात्री साडेसात वाजता आई-वडील भाजी घेऊन घरी आले. त्या वेळी त्यांची मुलगी घरी नव्हती. त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला. परंतु धनश्रीबाबत काहीच माहिती मिळाली नाही.
सर्वत्र शोध घेतल्यानंतर धनश्रीची आई अर्चना यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात आरोपींविरोधात अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांंनी धनश्रीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र त्यात यश मिळाले नाही. गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह पिंपरीमधील एच़ ए़ मैदानावरील झुडुपांमध्ये आढळला. तिचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला.
दरम्यान, धनश्री ज्या परिसरातून गायब झाली, त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता पुणेकर यांच्या घराच्या परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षीय व्यक्तीसोबत जात असल्याचे आढळले असल्याचे पोलीस अधिकाºयांनी सांगितले.