शिर धडावेगळं होऊन पडलं लोकलच्या डब्यात; दारात लटकलेल्या प्रवाशाचा खांबाला आपटून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 05:13 PM2021-03-24T17:13:43+5:302021-03-24T17:15:50+5:30
Accidental Death : अंबरनाथमध्ये लोकलच्या डब्यात आढळलं धड नसलेलं शिर
अंबरनाथ : रेल्वेच्या दारात लटकून प्रवास करणे किती जीवघेणं ठरू शकते, याचं आणखी एक धक्कादायक उदाहरण अंबरनाथमध्ये समोर आले आहे. दरवाजात लटकून प्रवास करताना रेल्वेच्या खांबाला डोके आपटून शीर धडावेगळं झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकात मंडलवरी रात्री १ वाजता अंबरनाथ लोकल आली. ही लोकल यार्डात जात असताना लगेजच्या डब्यात एक धड नसलेले शिर पडले असल्याचं स्टेशन मास्तरांनी पाहिले.
याबाबत माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी हे शिर ताब्यात घेत धडाचा शोध सुरू केला. ज्या डब्यात हे शिर आढळले होते, त्या डब्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात रक्त उडाले होते. त्यामुळे पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने शोध घेतला असता उल्हासनगर आणि अंबरनाथच्या सुभाष टेकडीजवळ रेल्वे रुळजावल हे धड आढळून आले. या व्यक्तीचे नाव हितेंद्र राजभर असल्याचे तपासात समोर आले आहे. हितेंद्र हा रात्री पाऊण वाजताच्या सुमारास उल्हासनगरहून अंबरनाथला यायला निघाला. मात्र दरवाजात उभा असताना अचानक त्याचे डोके खांबाला आपटले.
ही धडक इतकी जोरदार होती, की त्याचे शिर धडावेगळं होऊन डब्यात पडले, तर धड खाली पडले. याप्रकरणी आणि जीआरपीचे एसीपी सुनील पाटील यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली. या घटनेमुळे लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करणे किती जीवघेणे ठरू शकते, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.'' या घटनेमागे कोणताही घातपात नसून हा निव्वळ अपघात असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्यावर हा अपघात घडल्याची शक्यता आहे.