शरीरसंबंधाचे आमिष, व्यापाऱ्याचे अपहरण आणि आर्थिक लुट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 02:23 PM2019-03-30T14:23:19+5:302019-03-30T14:23:39+5:30
एका कपड्याच्या प्रतिष्ठित युवा व्यापाऱ्याला मागील काही दिवसांपासून एका अज्ञात महिलेचा फोन येत होता. यातून त्यांचे बोलणे अधिक वाढून त्या महिलेने युवकास भेटण्यास बोलावले...
कामशेत : शहरातील एका कपड्याच्या प्रतिष्ठित युवा व्यापाऱ्याला मागील काही दिवसांपासून एका अज्ञात महिलेचा फोन येत होता. यातून त्यांचे बोलणे अधिक वाढून त्या महिलेने युवकास भेटण्यास बोलावले. यावेळी शरीरसंबंध करण्यासाठी युवकाला जांभूळफाटा येथील लॉजवर नेले. त्यानंतर बाहेर आल्यावर अज्ञात चार ते पाच इसमांनी त्याचे अपहरण करत त्याला मारहाण करून पंचवीस लाख रुपयांची मागणी केली.
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २९) रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कामशेत मधील एक व्यापारी युवकास एका अज्ञात महिलेने फोन करून भेटण्यास तळेगाव एसटी स्थानकावर भेटण्यास बोलावले. युवक तेथे गेला असता महिलेची ओळख पटली व तिने युवकाला शरीरसंबंध करण्यासाठी त्याच्या दुचाकीवरून वडगाव हद्दीतील जांभूळफाटा येथील सनराईज लॉज मध्ये घेऊन गेली. व पुन्हा बाहेर आल्यानंतर युवकास लॉज बाहेर थांबलेल्या पाच जणांनी घेराव घालत त्यांच्या ताब्यातील चारचाकी वाहनात युवकास डांबून त्याचे अपहरण केले. त्यास गाडीत मारहाण करीत पवनानगर पौड रोडने अज्ञात स्थळी घेऊन जाऊन एका पडक्या घरात संपूर्ण कपडे काढून मारहाण केली. शिवाय महिलेच्या दिराला सर्व प्रकार सांगितला आहे. तिच्या लग्नासाठी पंधरा लाख रुपये खर्च केले असून तू आम्हाला पंचवीस लाख रुपये दे अशी मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत जबर मारहाण केली. तसेच त्याच्या खिशातील १५०० रुपये, महागडा मोबाईल घेतला. युवकाला धमकावत त्याच्या मोबाईल मधील ओनलाईन बँकिंग अप च्या माध्यमातून सुमारे ९६००० रुपये महिलेच्या खात्यावर पैसे ट्रान्स्फर केले. व २५ लाखातील उर्वरित रक्कम येत्या महिन्याच्या ६ तारखेपर्यंत दे अन्यथा तुला व तुझ्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या दरम्यान मध्यस्थीसाठी करुंज येथील एका इसमास बोलावून घेत पीडित युवकाला त्याच्याकडे देत कामशेत मध्ये दुचाकीवर सोडले. त्यानंतर युवक जबर मारहाण झाल्याने तो कामशेत येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेला असता डॉक्टरने त्याचे समुपदेशन करीत रात्री उशिरा पोलिसांना कळवले त्यामुळे सगळा प्रकार उघड झाला आहे. आणि एका महिलेसह अज्ञात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप करीत आहेत.