बेपत्ता ७० वर्षाच्या वृध्दाचा मृतदेह आढळला, लोखंडी तारेने गळा आवळून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 07:59 PM2020-06-20T19:59:22+5:302020-06-20T20:05:55+5:30
लोखंडी तारेने गळा आवळून खून केल्याचा संशय हिललाईन पोलिसांनी व्यक्त करून खूनाचा गुन्हा दाखल केला.
उल्हासनगर - गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या कॅम्प नं -५ येथील ७० वर्षाच्या वृद्धाचा मृतदेह वसार गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मोकळ्या जागेवर शुक्रवारी दुपारी मिळाला. लोखंडी तारेने गळा आवळून खून केल्याचा संशय हिललाईन पोलिसांनी व्यक्त करून खूनाचा गुन्हा दाखल केला.
उल्हासनगर कॅम्प नं -५ परिसरात राहणारे ७० वर्षाचे शेजुमल रामनानी गेल्या दोन दिवसंपासून बेपत्ता होते. शुक्रवारी दुपारी ३ वाजता वसार गावाकडे जाणाऱ्या रस्त्यातील वीज भट्टी जवळील मोकळ्या जागेत एका वृद्धाचा मृतदेह पडल्याची माहिती हिललाईन पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असता वृद्धाचा लोखंडी तारेने गळा आवळून खून केल्याचा संशय आला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख काढली असता मृताचे नाव शेजूमल रामनानी असल्याचे उघड झाले असून ते गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता असल्याचे मुलगा राजा रामनानी यांच्याकडून समजले. पोलिसांनी आर्थिक व्यवहार रातून खून झाल्याचा संशय व्यक्त केला असून शववि्छेदनानंतर मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिली. पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून अधिक तपास करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सावंत यांनी दिली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
कुटुंबाचा विरोध असताना लग्न केले, सख्ख्या भावाने बहिणीसह तिच्या पतीची चाकूने सपासप वार करून केली हत्या
पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना
Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली
रक्षक बनले भक्षक! गुंगीचे औषध देऊन पोलिसाने केला अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार
बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश
एकटीच टीव्ही बघत होती चिमुकली, संधीचा फायदा घेत नराधमाने घरात घुसून केले शोषण