मृत्यूनंतर दफन केलेल्या तरुणीचा मृतदेह ९ दिवसांनी पुन्हा बाहेर काढला; मृत्यूमागचं गूढ उकलणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 08:43 PM2024-08-08T20:43:36+5:302024-08-08T20:45:27+5:30

माझ्या मुलीचा तिच्या पतीने आणि सासरच्या व्यक्तींनी गळा आवळून खून केला आहे, असा आरोप अनमच्या वडिलांनी केला आहे.

Body of young woman buried after death exhumed after 9 days Will the mystery of death be solved | मृत्यूनंतर दफन केलेल्या तरुणीचा मृतदेह ९ दिवसांनी पुन्हा बाहेर काढला; मृत्यूमागचं गूढ उकलणार?

मृत्यूनंतर दफन केलेल्या तरुणीचा मृतदेह ९ दिवसांनी पुन्हा बाहेर काढला; मृत्यूमागचं गूढ उकलणार?

Crime News : विवाहित तरुणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिचा दफन केलेला मृतदेह पोलिसांनी तब्बल ९ दिवसांनंतर पुन्हा बाहेर काढला आहे. ही घटना राजस्थानातील जयपूर इथं घडली असून सदर तरुणीचा मृतदेह आता सवाई मानसिंह रुग्णालयात नेण्यात आला असून तिथं शवविच्छेदन केलं जाणार आहे. पती आणि त्याच्या नातेवाईकांनी गळा आवळून तिचा खून केल्याचा आरोप महिलेच्या माहेरच्या व्यक्तींनी केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ३० जुलै रोजी जयपूर इथं राहणाऱ्या २२ वर्षीय अनम या विवाहित तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. "अनम पाच महिन्यांची गर्भवती  होती. ३० जुलै रोजी तिची प्रकृती एकदम चांगली होती आणि मी तिला भेटून आलो होतो. मात्र त्यानंतर सायंकाळी ५ वाजता तिची तब्येत बिघडल्याची माहिती तिच्या सासरच्या लोकांनी दिली," असं अनमच्या वडिलांनी सांगितलं आहे.

अनम आजारी असल्याचं कळताच तिच्या वडिलांनी अनमच्या सासरी धाव घेतली. परंतु अनमला उपचारासाठी रुग्णालयात हलवल्याचं तिच्या वडिलांना सांगण्यात आलं. अनमचे वडील रुग्णालयातही पोहोचले. मात्र तिथं अनम नव्हती. दुसऱ्या दिवशी थेट तिचा दफनविधी करण्यात आला. 

दरम्यान, माझ्या मुलीचा तिच्या पतीने आणि सासरच्या व्यक्तींनी गळा आवळून खून केला आहे, असा आरोप अनमच्या वडिलांनी  केला असून या प्रकरणाची अखेर आता पोलिसांनी दखल घेत विवाहित तरुणीचा मृतदेह ९ दिवसांनंतर बाहेर काढला आहे.  शवविच्छेदन अहवालातून नेमकं काय सत्य समोर येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: Body of young woman buried after death exhumed after 9 days Will the mystery of death be solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.